Badlapur Sexual Assault Case : बदलापूरमधील शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळण्यासाठी बदलापूर नागरिक रस्त्यावर उरतले होते. २० ऑगस्टला बदलापूरकरांनी शाळेबाहेर आणि रेल्वे स्थानकात आंदोलन केलं. तब्बल ७-८ तास बदलापूरमधल्या नागरिकांनी रेलरोको आंदोलन केलं. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. याप्रकरणी मराठी सिनेसृष्टीतील कलाकार आवाज उठवून निषेध करत आहेत.

सोशल मीडियाद्वारे मराठी कलाकार पोस्ट लिहून बदलापूर प्रकरणावर ( Badlapur Sexual Assault Case ) आपलं परखड मत मांडताना दिसत आहेत. अभिनेता आस्ताद काळे, जुई गडकरी आणि कुशल बद्रिके यांनी प्रकरणावर मार्मिक पोस्ट लिहिली आहे; जी सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा – “एकदा का तो सुटला की तुझी…”, पंढरीनाथ कांबळेबद्दल बोलणाऱ्या जान्हवीवर भडकला सिद्धार्थ जाधव, म्हणाला…

अभिनेता आस्ताद काळेने लिहिलं आहे, “मुली…तू नोकरी करू नकोस…मुली…तू व्यवसाय करू नकोस…मुली…तू कॉलेजला जाऊ नकोस…मुली…तू शाळेत जाऊ नकोस…तुझ्या आसपासच्या अनेकांच्या दृष्टीत तू एक वस्तू आहेस. वस्तू कधी हे सगळं करतात का? वस्तू फक्त वापरल्या जातात. भोगल्या-उपभोगल्या जातात…विनातक्रार…मुली…तू फक्त वापरली जा…”

तसंच अभिनेता कुशल बद्रिकेने इन्स्टाग्राम स्टोरीवर आपलं मत मांडलं आहे. अभिनेत्याने लिहिलं आहे की, कुठल्याश्या देशात म्हणे असल्या गुन्हेगाराला भर चौकात उभं करुन लिंग कापतात आणि एका देशात तर दगडाने ठेचून मारतात. त्या यादीत माझा देश आला तर मला खूप आनंद होईल…आम्ही न्याय मिळाला पाहिजे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi : सुरज चव्हाणला घरी ‘या’ टोपणनावाने मारतात हाक; गुलीगतच्या आत्याने सांगितली खऱ्या नावामागची रंजक गोष्ट

Kushal Badrike
Kushal Badrike Post

‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री जुई गडकरीने देखील इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिलं आहे, ” कोलकाता, बिहार, दिल्ली, बदलापूर वगैरे…यांना डायरेक्ट पब्लिक धुलाईला द्या….कसले पुरावे हवे आहेत अजून…कसली वाट बघतोय आपण…किळस येते अक्षरशः…संताप होतो…गल्लिच्छ राक्षस…बदलापूरमध्ये ( Badlapur Sexual Assault Case ) जे झालं तसं व्हायला हवंय…कॅन्डल्स जाळून काही होत नाही.”

Jui Gadkari Post

हेही वाचा – “आकाशाकडे तोंड करून थुंकण्यासारखं…”, जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा अपमान केल्यामुळे भडकला अभिनेता, म्हणाला, “अर्धविराम एवढं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील ( Badlapur Sexual Assault Case ) आरोपीला अटक झाली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. तसंच जे जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहेत.