बिग बॉसचा १६ वा सीझन अखेर संपला. मात्र त्याची चर्चा अद्याप कायम आहे. या सीझनचा विजेता पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन ठरला. विजेतेपदासाठी प्रियांका चहर चौधरी आणि शिव ठाकरे यांची नाव सर्वाधिक चर्चेत असताना एमसी स्टॅन विजेता झाल्याने अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. अनेकांनी सोशल मीडियावरून यावर नाराजी व्यक्त केली. एवढंच नाही तर प्रियांका मित्र आणि बिग बॉस स्पर्धक अंकित गुप्तानेही एका मुलाखतीत, “आता तर काहीही न करताही बिग बॉस हा शो जिंकता येऊ शकतो.” असं वक्तव्य केलं होतं. अशात आता खुद्द प्रियांका चहर चौधरीहीचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

प्रियांका चहर चौधरीला ‘कलर्स टीव्ही’च्या ‘उडारिया’ मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर ती बिग बॉस १६ मध्ये दिसली होती. त्यामुळे अनेकांचा असा अंदाज होता की तिने याआधीच या चॅनेलबरोबर काम केलेलं असल्याने तिला विजेतेपद मिळणार आहे. मात्र लोकांचे अंदाज बिग बॉसच्या निर्मात्यांनी फोल ठरवले. प्रियांका टॉप २ मध्ये स्वतःची जागा बनवू शकली नाही. बिग बॉस फिनालेनंतर प्रियांका चौधरी मुंबईमध्ये दिसली. त्यावेळी फोटोग्राफर्सच्या प्रश्नाचं उत्तर देताना तिने बिग बॉसचा विजेता एमसी स्टॅनवर प्रतिक्रिया दिली.

आणखी वाचा- “ऐतिहासिक क्षण…” शिव ठाकरेबरोबरचा ‘तो’ फोटो शेअर करत ‘बिग बॉस’ विजेत्या एमसी स्टॅनची पोस्ट

आणखी वाचा- ‘बिग बॉस’नंतर सलमान खानकडून मोठी ऑफर? खुद्द शिव ठाकरेनेच केलं स्पष्ट; म्हणाला, “मला…”

पापाराजींशी बोलताना प्रियांकाने, “आजपर्यंत माझ्यावर माझ्या चाहत्यांनी जेवढं प्रेम केलं तसंच यापुढेही करत राहतील.” असं म्हटलं होतं. यानंतर एमसी स्टॅनबद्द विचारण्यात आल्यावर ती म्हणाली, “तो अमेझिंग आहे आणि खरं व्यक्तिमत्व आहे.” एवढं बोलून ती तिथून निघून गेली. प्रियांकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावरून युजर्सनी तिला ट्रोल केलं आहे.

priyanka reaction

प्रियांका चौधरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने यावर प्रतिक्रिया देताना लिहिलं, “एमसी स्टॅनला प्रसिद्धी मिळाली तर त्याला सगळे पसंत करू लागलेत त्याआधी त्याला कोणी विचारतही नव्हतं.” दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “एमसी स्टॅनचं नाव ऐकून तिचा मूडच बदलला. बिचारी, जळतेय त्याच्यावर पण तिला चांगलं बोलावं लागतंय.” याशिवाय आणखी काही युजर्सनी यावर कमेंट करत तिच्यावर टीका केली आहे.