Bigg Boss 17 Winner : ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. यावेळी टॉप ५ स्पर्धकांमध्ये मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अरुण या स्पर्धकांनी धडक मारली होती. अखेर अटीतटीच्या लढाईत प्रेक्षकांची सर्वाधिक मतं मिळवत शेवटी मुनव्वर फारुकीने विजेतेपदावर नाव कोरलं आहे.

‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून मुनव्वर विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. संपूर्ण सीझन त्याने उत्तम कामगिरी केली होती. ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मुनव्वरला वैयक्तिक आयुष्यातील अनेक चढउतारांचा सामना करावा लागला होता. या सगळ्या संकटांवर मात करत त्याने विजेतेपदावर नाव कोरलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेचा प्रवास संपला! टॉप ३ च्या शर्यतीतून बाहेर, जाऊबाईंना अश्रू अनावर

यंदा ‘बिग बॉस’च्या टॉप २ मध्ये मुनव्वर फारुकी व अभिषेक कुमार यांनी एन्ट्री घेतली होती. त्यामुळे ‘बिग बॉस’ची ट्रॉफी डोंगरीला जाणार की, गोबिंदगढला याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. अखेर मुनव्वरने या स्पर्धेत बाजी मारली आहे. तर अभिषेक कुमार या पर्वाचा उपविजेता ठरला आहे.

हेही वाचा : Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेच्या सासूबाईंना खुद्द सलमान खानने दिला सल्ला; म्हणाला, “या लोकांनी काहीच…”

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या यंदाच्या सीझनबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या ३ महिन्यांपासून या पर्वाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात १७ व्या पर्वाला सुरुवात झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस’मध्ये यंदा अभिषेक कुमार, इशा मालवीय, आएशा खान, मुनव्वर फारुकी, मनस्वी ममगई, सना खान, अरुण माशेट्टी, सनी आर्या, खानजादी, रिंकू धवन, जिग्ना वोरा, सोनिया बन्सल, नाविद सोल, अनुराग डोबाल, समर्थ जुरैल, मनारा चोप्रा या स्पर्धकांनी तसेच अंकिता लोखंडे-विकी जैन आणि नील-ऐश्वर्या या जोड्यांनी प्रवेश घेतला होता. अखेर या २० जणांमध्ये मुनव्वर फारुकीने बाजी मारली आहे.