‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर शिव ठाकरेच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. शिव ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाच्या विजेतेपदाचा दावेदार होता. परंतु, त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. ‘बिग बॉस’मधून प्रसिद्धी मिळवलेल्या शिवने काही दिवसांपूर्वीच नवी कोरी गाडी खरेदी केली होती. त्यानंतर आता शिवने चाहत्यांसाठी एक सरप्राइज आणलं आहे.

शिवने स्वत:चा नवा व्यवसाय सुरू केला आहे. ‘ठाकरे: चाय अँड सॅन्क्स’ नावाचा ब्रँड सुरू केला आहे. बुधवारी शिवने त्याच्या हा ब्रँड लॉन्च केला आहे. ‘ठाकरे: चाय अँड सॅन्क्स’ नावाने शिव मुंबई, पुणे व अमरावतीत रेस्टॉरंट सुरू करणार आहे. “ठाकरे: चाय अँड सॅन्क्स हा ब्रँड मोठा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. याबरोबरच या ब्रँडचे अनेक ठिकाणी रेस्टॉरंट्स मला सुरू करायचे आहेत”, असं शिव म्हणाला.

हेही वाचा>> प्राजक्ता माळीचं सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन, ‘या’ मालिकेत साकारणार भूमिका, व्हिडीओत दिसली झलक

हेही वाचा>> “त्याने शिवीगाळ केली, गाडीचं पॅनेल तोडलं” एमसी स्टॅनच्या मॅनेजरवर अब्दु रोझिकचे आरोप, म्हणाला “मुस्लीम भाई…”

नवीन ब्रँडबाबत शिव त्याच्या पालकांच्या प्रतिक्रियेबाबत विचारलं असता म्हणाला, “माझ्या आई-वडिलांना माझा गर्व आहे. पण त्यांना भेटता येत नसल्यामुळे ते नाराज आहेत. मी व्हिडीओ कॉलवर त्यांच्याबरोबर बोलतो”. शिवने त्याच्या आगामी चित्रपटाबाबतही यावेळी भाष्य केलं. तो म्हणाला, “पुढच्या सहा महिन्यात किंवा एका वर्षात मी तुम्हाला माझ्या चित्रपटाच्या प्रिमिअरसाठी भेटेन. यासाठी माझी तयारी सुरू आहे”.

हेही वाचा>> …अन् संजय राऊतांनी केलेलं कंगना रणौतच्या चित्रपटाचं कौतुक, म्हणाले “झाशीच्या राणींवर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिव ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातही सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेता ठरला होता. त्याबरोबरच शिवने ‘रोडीज’ या रिएलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता.