scorecardresearch

बॉडी शेमिंगवरुन बोलल्यानंतर अपूर्वा नेमळेकर भडकली, म्हणाली “राखी तुझ्यासारखी प्लास्टिक सर्जरी करुन…”

‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंत व अपूर्वा नेमळेकरमध्ये प्लास्टिक सर्जरीवरुन कॅट फाइट

बॉडी शेमिंगवरुन बोलल्यानंतर अपूर्वा नेमळेकर भडकली, म्हणाली “राखी तुझ्यासारखी प्लास्टिक सर्जरी करुन…”
अपूर्वा व राखीमध्ये 'बिग बॉस'च्या घरात कॅटफाइट. (फोटो: कलर्स मराठी)

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व दिवसेंदिवस रंजक होत चाललं आहे. राखी सावंतने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्यापासूनच घरात धुमाकूळ घातला आहे. काहीतरी करुन राखी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

कॅप्टन्सी टास्क दरम्यान बाद केल्यामुळे राखीने अमृता देशमुखवर पीठ टाकत घरात राडा केला. त्यानंतर दुपारी जेवताना डायनिंग एरियामध्येही ती अमृताला त्रास देताना दिसली. त्यावर अपूर्वा नेमळेकर “लंच टाइम झाला आहे, त्यामुळे अमृताला जेवू दे. तुम्ही नंतर बोला” असं राखीला म्हणाली. यावर राखीने बॉडी शेमिंग करत घरातील सदस्यांबाबत “बिग बॉसच्या घरातील खाऊन खाऊनच कमरेचे कमरा झाले आहेत” असं वक्तव्य केलं.

हेही वाचा>> सलमान खान रिलेशनशिपमध्ये? ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर डेटिंगच्या चर्चांना उधाण

हेही वाचा>> आधी कॉफी डेट अन् आता थेट लॉंग ड्राइव्ह; अक्षया-हार्दिकच्या रोड ट्रिपचा फोटो व्हायरल

राखीचं हे बोलणं ऐकून अपूर्वा संतापली. ती राखीला म्हणाली “राखी, याआधीही तू दोन-तीन वेळा माझ्या वजनावर बोलली आहेस. मी मल्टिपल सर्जरी करत नाही. माझी नॅचरल ब्युटी आहे”. यावर राखी तिला “हो, मी प्लास्टिक सर्जरी केली आहे. तुला काय होतंय. तू जळतेस का माझ्यावर? माझा संपूर्ण इतिहास काढून आली आहेस. माझी ही सर्जरी झालीये, ती सर्जरी झालीये. त्यात काय आहे. तू पण कर”, असं उत्तर देते.

हेही वाचा>> Video: क्लासिक इंटेरिअर, प्रशस्त हॉल अन् खिडकीतून दिसणारी मुंबई; सिद्धार्थ-मितालीने असं सजवलं त्यांच्या स्वप्नातलं घर

अपूर्वा यावर पुढे म्हणते, “मी तुझा इतिहास वगैरे काढून आले नाही. राखी मी खरंच तुझी फॅन होते. पण आता तुला हे सगळं करताना बघून मला खूप त्रास झाला”. त्यानंतरही राखीने घरात खूप ड्रामा केल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 16:37 IST

संबंधित बातम्या