Dancer Gautami Patil & Devmanus Fame Naru Aaji : ‘झी मराठी’ वाहिनीवर २ जूनपासून ‘देवमाणूस- मधला अध्याय’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाड प्रमुख भूमिका साकारत आहे. यापूर्वीच्या ‘देवमाणूस’ मालिकेच्या गाजलेल्या दोन्ही सीझनमध्ये किरणनेच मुख्य भूमिका साकारली होती. सध्या ही मालिका एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे.

‘देवमाणूस’ मालिकेच्या नुकत्याच सुरू झालेल्या सीझनमध्ये लवकरच लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील एन्ट्री घेणार आहे. तिच्या ठसकेबाज लावणीची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. याशिवाय गौतमीचा चाहतावर्गही गावागावांत मोठ्या प्रमाणात आहे. यामुळेच आता गौतमी छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘झी मराठी’च्या ‘देवमाणूस’ मालिकेत तिची एन्ट्री होणार आहे.

सध्या गौतमी पाटीलचे ‘देवमाणूस’ मालिकेच्या सेटवरचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यापैकी एका व्हिडीओमध्ये गौतमी पाटील आणि नरू आजी व्हायरल गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. “पाव्हणं जेवला काय…” हे मराठी गाणं सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंग असतं. याच लोकप्रिय गाण्यावर गौतमी पाटील आणि नरू आजीने एकत्र जबरदस्त डान्स केला आहे.

या व्हिडीओमध्ये नरू आजी… नऊवारी साडी, डोळ्याला गॉगल अशा डॅशिंग लूकमध्ये गौतमीसह थिरकली आहे. डान्स केल्यावर गौतमीने आजीला जवळ घेत तिचं कौतुक केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

“देवमाणूस मालिका कमाल आहे”, “दोघीही सुंदर नाचल्या”, “खरंतर ही आजीच सगळा शो पुढे घेऊन जात आहे”, “जबरदस्त एनर्डी नरू आजी”, “कमाल आजी भारी डान्स केला” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या मालिकेची निर्माती श्वेता शिंदेने ‘देवमाणूस’च्या निमित्ताने गौतमीला मोठी संधी दिली आहे. गौतमीने यापूर्वी अनेक गाण्यांचे व्हिडीओ अल्बम, ‘घुंगरू’ सिनेमा आणि रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम केलेलं आहे. मात्र, या मालिकेच्या निमित्ताने गौतमी पहिल्यांदाच मालिकेत अभिनय करताना दिसेल.