हार्दिक जोशी व अक्षया देवधर सध्या त्यांच्या सुखी संसारामध्ये रमले आहेत. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर अक्षयाने सोशल मीडियाद्वारे एक खास पोस्ट शेअर केली होती. कोल्हापुरच्या महालक्ष्मीचं दोघांनीही यानिमित्त दर्शन घेतलं होतं. हार्दिक व अक्षया सध्या त्यांच्या कामामध्ये व्यग्र आहेत. पण कामामधून वेळ काढत हे सुप्रसिद्ध जोडपं गोव्याला पोहोचलं आहे.

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

हार्दिक व अक्षया लग्नानंतर हनिमूनला गेलेच नाहीत. कामामध्ये व्यग्र आहे पण वेळात वेळ काढून अक्षया फिरायला नेणार असल्याचं हार्दिकने मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. आता हे दोघं निवांत वेळ मिळावा म्हणून गोव्यामध्ये मजामस्ती करत आहे. यादरम्यानचे काही फोटो अक्षयाने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

अक्षयाने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघंही गोव्यामधील रस्त्यावर बसले आहेत. चक्क तिथे बसून त्यांनी फोटो काढले आहेत. तर एक फोटो सुर्यास्तादरम्यानचा आहे. या फोटोमध्ये हार्दिक व अक्षया एकमेकांकडे बघताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये दोघांचा साधेपणा दिसून आला.

आणखी वाचा – रितेश व जिनिलीयाचा ‘वेड’ बॉक्स ऑफिसवर ठरतोय सुपरहिट, सहा दिवसांमध्येच कमावले इतके कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोव्यामध्ये गेले असतानाही हार्दिक व अक्षयाने अगदी साधा लूक केला असल्याचं पाहायला मिळत आहे. २ डिसेंबरला हार्दिक-अक्षयाने लग्नगाठ बांधत त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. हार्दिक लवकरच ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात तो महत्त्वाची भूमिका साकारताना दिसेल.