टीव्ही अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. हिनाने नुकतेच तिचा प्रियकर रॉकी जयस्वालशी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत. लग्नाच्या काही दिवसांनी हिना खान कामावर परतली आहे.
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिने एका कार्यक्रमात हजेरी लावली, याशिवाय तिने तिच्या लग्नाचा व्हिडीओही शेअर केला. आता हिना खानने लग्नानंतरची पहिली ईद साजरी केली, ज्याची एक झलक हिनाने सोशल मीडियावर चाहत्यांना दाखवली आहे.
हिना खान लग्नानंतर तिच्या सासू-सासऱ्यांच्या घरी पहिली ईद साजरी करत आहे. हिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या स्वयंपाकघरातील तयारीचा एक फोटो शेअर केला आहे, जो आता व्हायरल होत आहे. हिनाने शेअर केलेल्या फोटोंपैकी एक डायनिंग टेबलचा आहे, जो पांढऱ्या क्रॉकरी सेटने सजवलेला आहे. दुसऱ्या फोटोत ती साध्या सलवार सूटमध्ये दिसत आहे. तिच्या मांडीवर सॅलेडची प्लेट आहे.
हिना खानने सोफ्यावर बसलेल्या तिच्या फोटोबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले, “वधू ड्युटीवर आहे. ईदच्या जेवणाची तयारी सुरू आहे.” दुसऱ्या फोटोमध्ये तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ईद मुबारक. चलो…’ यादरम्यान हिना खूप आनंदी दिसत आहे. तिचे हास्य पाहून चाहत्यांनाही खूप बरे वाटत आहे, यावर चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

हिना खानने बुधवार, ४ जून रोजी तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाचे फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. तिने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली ओपल हँडलूम साडी घातली होती, ज्यावर सोनेरी आणि चांदीच्या धाग्याने पारंपरिक डिझाइन बनवले होते. रॉकीने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला ऑफ-व्हाइट कुर्ता घातला होता.
हिना आणि रॉकी यांची पहिली भेट ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. हिना या मालिकेत मुख्य भूमिकेत होती, तर रॉकी या मालिकेचा निर्माता होता.
हिनाने जून २०२४ मध्ये तिला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली होती. तिच्यावर सर्जरी आणि किमोथेरपी पार पडली. कॅन्सरशी झुंज देण्याचा हा संपूर्ण प्रवास ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर सतत शेअर करत होती. किमोथेरेपी सुरू करण्यापूर्वी हिनाने तिचे केससुद्धा कापले. किमोथेरेपीमुळे केस गळतात, त्यामुळे आधीच हिंमत दाखवत हिनाने तिचे केस छोटे केले, त्याचा व्हिडीओसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.