Lakhat Ek Amcha Dada Upcoming Episode : सूर्या आणि तुळजाच्या लग्नामुळे ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेला नवं वगळं आलं आहे. एकाबाजूला तुळजाचं सिद्धार्थबरोबर लग्न करण्याचं स्वप्न असतं. तर दुसऱ्याबाजूला डॅडी तुळजाचं लग्न सत्यजीतशी करण्यासाठी इच्छूक असतात. त्यामुळे तुळजाच्या लग्नाची तयारी करण्याची जबाबदारी डॅडी सूर्याच्या खांद्यावर देतात. यात सूर्या मधेच अडकतो. तुळजाचं स्वप्न पूर्ण करायचं की डॅडींचा विश्वास जपयाचा हे त्याला कळतं नसतं.

अखेर सूर्या तुळजाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला भर मंडपातून पळवून नेतो. पण यामुळे गैरसमज पसरतो. सूर्यानेच लग्न करण्यासाठी तुळजाला पळवून नेल्याचं सगळेजण बोलू लागतात. हे ऐकताच डॅडींच्या पाया खालची जमीन सरकते. डॅडी रागाच्या भरात तुळजाचं लग्न सूर्याशी लावून देतात. लग्नानंतर आता सूर्या तुळजाला एक शब्द देतो. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. ( Lakhat Ek Amcha Dada )

हेही वाचा – Video: “आपण यांना गेममध्ये हलवून टाकू…”, सूरज चव्हाणने संग्राम चौगुलेबरोबर केला प्लॅन, म्हणाला…

Lakhat Ek Amcha Dada ( Photo Credit - Zee Marathi )
Lakhat Ek Amcha Dada ( Photo Credit – Zee Marathi )

‘झी मराठी’च्या सोशल मीडिया पेजवर ‘लाखात एक आमचा दादा’ ( Lakhat Ek Amcha Dada ) मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये तुळजा रडत सूर्याला म्हणते की, मला इथे अडकून नाही राहायचं आहे. या घरात, या गावात आणि या नात्यात पण. हे ऐकून सूर्या हात जोडून तिला म्हणतो, “या घराला आधीच मोठा डाग लागलाय. नको हे घर सोडून जाऊ. हे घरचं कोसळेलं गं. माझ्या बहिणीशी कोणीचं लग्न करणार नाही, तुळजा.”

त्यानंतर तुळजा म्हणते, “माझी पण काहीतरी स्वप्न आहेत. मला माझ्या मनासारखं आयुष्य जगायचं आहे.” तेव्हा सूर्या म्हणतो, “मी तुला शब्द देतो. एका वर्षाच्या आत माझ्या बहिणीची लग्न करीन आणि मग सगळी तुझी स्वप्न पूर्ण करेन.” त्यावर तुळजा म्हणते, “मी राहीन या घरात पण फक्त एका वर्षासाठी. “

हेही वाचा – “खोकल्यावर उपाय केलात पण…”, संग्राम चौगुलेच्या जबरदस्त खेळावर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “ब्रिंग बॅक राखी”

हेही वाचा – Video: तुळजा झाली जगतापांची सून, गृहप्रवेश करत असताना डॅडींनी घेतला टोकाचा निर्णय, पाहा ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नवा प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता या एका वर्षात सूर्या बहिणीची लग्न कशी करतो? आणि यादरम्यान सूर्या व तुळजाच्या नात्याला काही वेगळं वळण मिळतं का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ( Lakhat Ek Amcha Dada )