अगदी कमी कालावधीतच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेने प्रेक्षकांना आपलंस केलं. या मालिकेमधील प्रार्थना बेहरे व श्रेयस तळपदे म्हणजे नेहा-यशच्या जोडीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. मालिकेमध्ये सगळं काही सुरळीत सुरु असताना एक नवा ट्विस्ट आला आहे. यश व नेहाच्या गाडीला अपघात झाला असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यानंतर मालिकेच्या कथानकाने एक वेगळंच वळण घेतलं. नेहाची मुलगी परी व यश पुन्हा एकत्र येतात. मात्र नेहाचा बेपत्ता असल्याचं दाखवण्यात येत आहे.

आणखी वाचा – आधी आई गेली अन् १४ दिवसांनी बाबाही… ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ वेदनादायी प्रसंग

नेहा बेपत्ता झाल्यामुळे परीला मात्र खूप दुःख झालं आहे. यादरम्यानचाच एक व्हिडीओ झी मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. यामध्ये परी शाळेमधील वकृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होते. यावेळी ती आपल्या आईबाबत व्यक्त होताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

यश तसेच त्याच्या घरातील मंडळी परीच्या शाळेमध्ये जातात. परी आपल्या आईबाबत बोलत आहे हे ऐकून सारेच जण भावुक होतात. परी म्हणते, “माझी आई न सांगता निघून गेलेली मला कधीच आवडणार नाही. असं कधी कुणी करतं का? आई मला न सांगता कधीच कुठे गेली नाही. बाहेर गेली की सतत फोन करायची. म्हणायची परी मला सगळं सांगायचं. दुसरं कोण आहे आपल्याला तुला मी आणि मला तू.”

आणखी वाचा – Video : प्रार्थना बेहरे व श्रेयस तळपदेचा रोमान्स, ‘तो’ व्हिडीओ पाहून अभिनेत्रीच्या नवऱ्याने केलेली कमेंट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आई चिडली की मारही द्यायची असंही परी या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. परीचं हे भाषण ऐकून यशलाही अश्रू अनावर होतात. तर हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांनीही आम्हाला रडू आलं असल्याचं कमेंटच्या माध्यमातून सांगितलं आहे. तसेच नेहाच लवकर परत आणण्याची मागणी प्रेक्षक सतत करत आहेत.