scorecardresearch

‘बिग बॉस १६’तील मंडळी ग्रुप संपुष्टात? अब्दु रोजिकच्या धक्कादायक विधानावर शिव ठाकरेची प्रतिक्रिया, म्हणाला…

मंडळी हा ग्रुप संपला असल्याचं अब्दुने सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचं बोललं जात होतं.

shiv abdu

बिग बॉस हिंदीचं १६वं पर्व काही दिवसांपूर्वीच संपन्न झालं. पहिल्या दिसपासूनच हे पर्व या स्पर्धकांच्या वादामुळे आणि काहींच्या मैत्रीमुळे खूप चर्चेत आलं. या सीझनमध्ये ‘मांडली’ची बरीच चर्चा झाली होती. शिव, एमसी स्टेन, साजिद खान, अब्दू रोजिक, निमृत आणि सुंबुल तौकीर खान यांचा या ग्रुपमध्ये समावेश होता. त्यांची मैत्री प्रेक्षकांना आवडली होती. पण आता अब्दुने या मैत्रीबद्दल मोठं विधान केलं.

अब्दु रोजिक सध्या त्याच्या ‘चलाक ब्रो’ या नवीन गाण्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्त तो अनेक मुलाखती देत आहे. आता अशाच एका मुलाखतीत त्याला मंडळी या त्यांच्या ग्रुपबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो मंडळी हा ग्रुप संपला असल्याचं सांगितलं. त्याचं हे बोलणं ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. तेव्हापासून त्यांची मैत्री तुटली असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.

आणखी वाचा : “इस्लाम धर्माची थट्टा…” ‘त्या’ व्हिडीओमुळे राखी सावंत झाली ट्रोल

तर त्या पाठोपाठ लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या निमृत कौरला मंडळीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “तुला मंडळीतील कोणत्या सदस्याबतोबर रॅम्पवर चालवायला आवडेल?” असा प्रश्न तिला विचारण्यात आल्यावर “तुम्ही मला नेहमी मंडळीबद्दलच का प्रश्न विचारता?” असं तिने उत्तर दिलं होतं. त्यामुळे त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचं बोललं जात होतं. पण आता शिवने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : ‘बिग बॉस १६’नंतर शिव ठाकरे झळकणार मराठी चित्रपटात?, म्हणाला, “मी पाहिलेलं स्वप्न लवकरच…”

तर या चर्चा सुरू असतानाच शिवने एक पोस्ट शेअर करत लिहीलं, “हक से मंडळी. हमेशा हमेशा के लिये.” त्यामुळे त्याची ही पोस्ट पाहून त्यांच्या चाहते खुश झाले. त्यांच्यात कोणताही वाद झालेला नाही अशी आता सर्वांना खात्री पटली असून त्यांच्यातली मैत्री संपली असल्याच्या चर्चांना ब्रेक लागला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 18:33 IST