छोट्या पडद्यावरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेत महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध घेण्यात आला. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावून सेवा देणाऱ्या पोलिसांची शौर्यगाथा या मालिकेत पाहायला मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका पुन्हा सुरु करा, अशी मागणी चाहत्यांकडून केली जात आहे. आता नुकतंच अभिनेता सोहम बांदेकरने याबद्दल भाष्य केले आहे.

‘नवे लक्ष्य’ ही मालिका ७ मार्च २०२१ रोजी सुरु झाली होती. याची निर्मिती सोहम प्रॉडक्शन्सने केली होती. या मालिकेत सोहम बांदेकर, अभिजीत श्वेतचंद्र, उदय सबनीस, अमित डोलावत, शुभांगी सदावर्ते या कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली होती. नुकतंच सोहमने इन्स्टाग्रामवर Ask me anything हे सेशन घेतले. यावेळी त्याला एका चाहत्याने ‘नवे लक्ष्य’ मालिकेबद्दल प्रश्न विचारला.
आणखी वाचा : आदेश बांदेकरांच्या लेकाचा गर्लफ्रेंडबद्दल खुलासा, म्हणाला “माझं आयुष्य…”

“तुम्ही खूप चांगले अभिनेते आहात. तुमची नवे लक्ष्य मालिका परत कधी चालू होणार. मी या मालिकेचे नवीन एपिसोड मिस करते पाहायला”, असे एका चाहत्याने सोहमला सांगितले आहे. त्यावर सोहमने त्याला मनमोकळेपणाने उत्तर दिले.

soham bandekar reply
सोहम बांदेकर

आणखी वाचा : “इतका रिकामी असतोस का?” आदेश बांदेकरांच्या लेकाला चाहत्याचा प्रश्न, सोहम म्हणाला “निकामी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“धन्यवाद आम्ही पण मिस करतो नवे लक्ष्य”, असे सोहमने यावेळी म्हटले आहे. त्याबरोबर त्याने हात जोडल्याचा इमोजीही शेअर केला आहे. दरम्यान “नवे लक्ष्य” ही सोहमची पहिलीच मालिका होती. या मालिकेत सोहमने जय सुवर्णा दीक्षित ही भूमिका साकारली होती. आता तो बाईपण भारी देवा या चित्रपटात झळकत आहे. यात त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.