छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आजही लोकप्रिय आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. सध्या धनश्री ही ‘तू चाल पुढे’ या मालिकेत झळकत आहे. काही दिवसांपूर्वी धनश्रीने ठाण्यात नवीन घर खरेदी केलं आहे. आता तिने तिच्या घराच्या इंटेरिअरबद्दल खुलासा केला आहे.

धनश्री काडगावकरने गणेशोत्सवादरम्यान नवीन घर खरेदी केल्याची माहिती दिली. यावेळी तिने दोन फ्लॅट खरेदी केल्याचे सांगितले. यानंतर आता तिने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तिने तिच्या घराच्या इंटेरिअर आणि फर्निचरबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : Video : “स्वप्न खरी होतात…”, ‘वहिनीसाहेब’ धनश्री काडगावकरने ठाण्यात खरेदी केली दोन घरं, व्हिडीओत दाखवली झलक

“मला खूप सुंदर घर मिळालं आहे. आता या घराचे इंटेरिअर आणि फर्निचरचं काम बाकी आहे. या घरात बिल्डरने आम्हाला थोडंस फर्निचर आधीच करुन दिलं आहे. आता हा फ्लॅट पूर्ण रिकामा आहे. इंटेरिअरच्या बाबतीत माझी आणि माझ्या नवऱ्याची मतं बदलत आहेत. हे बनवायचं, ते बनवायचं नाही, हेच सध्या सुरु आहे.

त्यात फ्लॅट घेताना सर्व बजेट संपलंय आणि इंटेरिअर करायला अजिबात पैसे उरलेले नाहीत. त्यामुळे माझे पती फार हे नको, ते नको, असं करत आहेत. याचा मला खूप राग येतो. जर इंटेरिअरच केलं नाही तर नवीन घराची मज्जा काय? त्यामुळे जरा तारेवरची कसरत सुरु आहे”, असे धनश्री काडगावकरने म्हटले.

आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान धनश्रीने ठाणे पश्चिम या ठिकाणी नवीन घर खरेदी केले आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या दोन्ही घरांचा व्हिडीओ शेअर केला होता. तिने एक वन बीएचके आणि दुसरा टू बीएचके अशी दोन घरं खरेदी केली आहेत.