छोट्या पडद्यावर येत्या काळात बऱ्याच नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिका. अभिनेता सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची प्रमुख भूमिका असलेली ‘तू भेटशी नव्याने’ मालिका लवकरच सुरू होणार आहे. मराठी मालिकाविश्वात ही मालिका विशेष आहे. कारण या मालिकेत पहिल्यांदाच एआयचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सुबोध भावे आणि शिवानी सोनारीची ही नवी मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

८ मेला ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला होता; ज्यामध्ये सुबोध भावे आणि शिवानी सोनारीची जबरदस्त एन्ट्री दाखवण्यात आली होती. तसंच एआयचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करून तरुणपणातल्या सुबोध भावेने सगळ्यांचं लक्ष वेधलं. लवकरच या नव्या मालिकेची वेळ जाहीर होणार आहे. पण मालिका सुरू होण्यापूर्वी शिवानीने सुबोध भावेला खास भेटवस्तू दिली आहे. यासंदर्भात तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्रीचं सहा वर्षांनंतर मराठी मालिकाविश्वात जबरदस्त कमबॅक, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत झळकणार

“सुरुवात गोड तर सगळंच गोड म्हणून माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट. सुबोध सरांची मला आवडलेली आत्तापर्यंतची कामे आणि आता ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या निमित्ताने मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ही छोटीशी भेटवस्तू,” असं कॅप्शन देत शिवानीने सुबोध भावेला भेटवस्तू देतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुबोध भावेला शिवानीने भेटवस्तू म्हणून दिलेली फ्रेम पाहायला मिळत आहे. या फ्रेममध्ये सुबोध भावेच्या मालिका आणि चित्रपटाचे पोस्टर आहे.

हेही वाचा – Video: लाकडी दरवाजा, आकर्षक नेमप्लेट अन्…; अक्षय केळकरने नव्या घराची दाखवली पहिली झलक, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – कालीन भैय्या आणि गुड्डू पंडितची आतुरतेने पाहताय वाट, तर ‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाची तारीख दडलीये ‘या’ फोटोमध्ये, शोधा

तू भेटशी नव्याने’ मालिका कधीपासून सुरू होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सोनी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सुबोध भावे मालिका कधीपासून होणार याविषयी सांगताना पाहायला मिळाला. आजपासून ‘भूमिकन्या’ नवीन मालिका सुरू होतं आहे. याच मालिकेच्या दरम्यान ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होणार आहे.