‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता ओंकार भोजने घराघरांत लोकप्रिय झाला. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गेली अनेक वर्षे तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. परंतु, ओंकारने इतर काही कामांसाठी मध्यंतरी हास्यजत्रेतून ब्रेक घेतला होता. यानंतर त्याचे चाहते काहीसे नाराज झाले होते. परंत, आता प्रेक्षकांचा लाडका ओंकार भोजने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या नव्याकोऱ्या कॉमेडी शोमधून ओंकार पुन्हा एकदा प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणार आहे. हास्यजत्रा सोडल्यावर मधल्या काळात त्याने अनेक चित्रपट व नाटकात काम केलं. आता ओंकारच्या नव्या शोसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हास्यजत्रा सोडल्यावर त्याठिकाणी काम करणाऱ्या कलाकारांशी अभिनेत्याचं कसं बॉण्डिंग आहे. याबद्दल ओंकारने नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा : ‘कलर्स मराठी’वर सुरू होणार ‘अबीर गुलाल’! गायत्री दातारचं पुनरागमन, तर जोडीला असेल ‘बापल्योक’ फेम अभिनेत्री, पाहा प्रोमो

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील मित्रांची किती आठवण येते याबद्दल सांगताना ओंकार भोजने म्हणाला, “ते एक कुटुंब आहे आणि आपल्याकडे कसं असतं. जर आपण एखाद्या समारंभाला गेलो नाहीतरी काहीच बिघडत नाही. सगळे आपल्यावर तेवढंच प्रेम करतात अगदी तसंच आहे. आज सकाळची गोष्ट सांगायची झाली तर, गौरव मोरे इथेच शूट करत होता. त्यामुळे आम्ही एकत्र भेटलो, गप्पा मारल्या आणि कामावर परतलो असं आमचं बॉण्डिंग आहे.”

हेही वाचा : Video: ‘सुख कळले’नंतर ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेची घोषणा; रश्मी अनपट, रेशम टिपणीससह झळकणार ‘हे’ कलाकार

“आपण एखादी चांगली गोष्ट करताना नकळत एकमेकांशी खूप जोडले जातो. त्यामुळे त्या सगळ्यांशीच माझं एक सुंदर नातं आहे. कलाकार आणि माणूस म्हणून अशी मैत्री ठेवणं खूप महत्त्वाची गोष्ट असते. पैसा, नाव, प्रसिद्धी या गोष्टी माझ्यासाठी नंतर येतात. पण, सगळ्यात जास्त ही माणसं महत्त्वाची आणि ती माझ्याबरोबर कायम राहणार आहेत.” असं ओंकार भोजने याने सांगितलं.

हेही वाचा : ऐश्वर्या व अविनाश नारकरांना ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याने मागितली माफी; म्हणाला, “माझी कमेंट व भाषा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम यांच्याबरोबर ओंकार भोजने धमाल करताना दिसणार आहे.