scorecardresearch

Video: चार महिन्यांनंतर राहुल वैद्य व दिशा परमारने दाखवली लेकीची पहिली झलक, नेटकरी म्हणाले, “बाबाची कार्बन कॉपी…”

राहुल वैद्य व दिशा परमारच्या लेकीचा पहिला व्हिडीओ व्हायरल

rahul vaidya and disha parmar revealed daughter navya face video goes viral
राहुल वैद्य व दिशा परमारच्या लेकीचा पहिला व्हिडीओ व्हायरल राहुल वैद्य व दिशा परमारच्या लेकीचा पहिला व्हिडीओ व्हायरल

गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार गेल्या वर्षी आई-बाबा झाले. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी २० सप्टेंबर २०२३ला दिशा परमारने एका गोंडस मुलीला जन्म दिला. “घरी लक्ष्मी आली,” असं लिहित दोघांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून चाहते राहुल व दिशाच्या लेकीला पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर चार महिन्यांनंतर राहुल व दिशाने लेकीची पहिली झलक दाखवली आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर राहुल वैद्य व दिशा परमारच्या लेकीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मुंबई विमानतळावरील हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये दोघं सर्व पापाराझींना आपल्या मुलीची ओळख करून देताना दिसत आहे. राहुल व दिशाने त्यांच्या मुलीचं नाव ‘नव्या’ ठेवलं आहे. नव्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

Anushka sharma and Virat Kohli Welcomes Baby Boy marathi news
विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन, बाळाचं नाव ठेवलं…
Jackky Bhagnani relation with Deshmukh family
रितेश देशमुखच्या वहिनीचा सख्खा भाऊ आहे जॅकी भगनानी, बहीण व भाच्यांबरोबर शेअर केलेत खास फोटो
Shivani Surve and Ajinkya Nanaware Wedding Updates in Marathi
शिवानी सुर्वे झाली ननावरेंची सून! आधी गुपचूप साखरपुडा अन् आज लग्नाच्या बेडीत; थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
gashmeer mahajani shares incident during his father ravindra mahajani death
“आईला उलट्या, कुजलेल्या मांसाचा वास अन्…”, गश्मीर महाजनीला वडिलांच्या निधनाचे ‘असे’ मिळालेले संकेत; म्हणाला…

हेही वाचा – रिंकू राजगुरु सुबोध भावेसह झळकणार नव्या चित्रपटात, जोडीला असणार प्रार्थना बेहेरे, फोटो आले समोर

या व्हिडीओवर राहुल व दिशाच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘राहुलची कार्बनी कॉपी’, ‘सेम राहूल’, ‘पूर्णपणे राहूलसारखीच दिसतेय’, ‘नव्या खूप गोड आहे’, अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस ओटीटी २’ विजेत्याने रेस्टॉरंटमध्ये एकाच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर म्हणाला, “मी असाच आहे…”

दरम्यान, जेव्हा राहुल बाबा झाला तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया होती की, मला मुलगी झाल्याचं समजताच मी तीन-चार तास गप्प बसलो होतो. काय होतंय? हेच कळतं नव्हतं. मी सहा वेळ रडलो. अजूनही जेव्हा मुलीला पाहतो, तेव्हा माझ्या डोळ्यातील अश्रू अनावर होतात. जेव्हा मी तिच्याशी बोलतो तेव्हा मला दाटून येत. या आनंदाच्या क्षणी सर्वात पहिल्यांदा फोन मला सोनू निगम यांनी केला. ‘आमचा मुलगा बाबा झाला’ म्हणत त्यांनी मला शुभेच्छा दिल्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rahul vaidya and disha parmar revealed daughter navya face video goes viral pps

First published on: 12-02-2024 at 20:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×