मराठी गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांचा प्रसिद्ध मराठी टॉक शो ‘खुपते तिथे गुप्ते’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल १० वर्षांनी पुन्हा एकदा हा कार्यक्रम सुरु होणार आहे. अवधूत गुप्तेच्या आगामी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात राज ठाकरे हजेरी लावणार आहेत

खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात नुकतंच राज ठाकरेंनी हजेरी लावला. या कार्यक्रमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात अवधूत गुप्तेंनी राज ठाकरेंना ट्रोलर्सने विचारलेले काही प्रश्न दाखवले. त्यावेळी राज ठाकरेंना तुमच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाबद्दल विचारले असता त्यांनी त्यावर फारच हटके पद्धतीने उत्तर दिले.
आणखी वाचा : “मी आतापर्यंत दिलेल्या मुलाखतींपैकी…” राज ठाकरेंनी सांगितला ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या शूटींगचा अनुभव

Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे

“राज साहेब तुमच्या पक्षात महेश मांजरेकर, अमेय खोपकर, अभिजीत पानसे असे सिनेमे बनवणारे लोक पक्षात आहेत. पण एकालाही तुमच्यावर सिनेमा का काढावासा वाटला नाही?” असा प्रश्न विचारण्यात आला.

आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…

यावर राज ठाकरेंनी “माझ्यात तसं मटेरिअल नसेल”, असे मजेशीर उत्तर दिले.त्यावर अवधूत गुप्तेने “साहेब तुमचं आयुष्य आपकी जिंदगी इतनी लंबी नही इतकी बडी भी है, तुम्ही वेबसीरिजच सुरु करा. त्याचे अनेक सिझन होतील”, असे म्हटले.

दरम्यान ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. यात राज ठाकरे सहभागी होणार आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम तब्बल १० वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.