Reshma Shinde Kelvan : ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमुळे अभिनेत्री रेश्मा शिंदे घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या ही छोट्या पडद्यावरची लाडकी अभिनेत्रीने तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. रेश्मा येत्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील कलाकारांनी रेश्माचं केळवण केलं होतं. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. रेश्माचं लग्न होणार हा तिच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का होता. त्यामुळे सर्वत्र अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

रेश्मा शिंदेच्या केळवणाची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली असतानाच आता अभिनेत्रीने आणखी व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रेश्माचं दुसरं केळवण तिच्या दोन लाडक्या मैत्रिणींनी केलं आयोजित केलं होतं. यासाठी या तिघी मैत्रिणी हॉटेलमध्ये एकत्र जेवायला गेल्या होत्या. याची खास झलक रेश्माने एका व्हिडीओद्वारे आपल्या चाहत्यांना दाखवली आहे.

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’चं शूटिंग संपलं, आता ‘ही’ अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात; समोर आले केळवणाचे फोटो…

रेश्मा शिंदे लवकरच अडकणार विवाहबंधनात

रेश्माने या व्हिडीओला ‘मेरे सपनों का राजकुमार आ रहा हैं’ असं कॅप्शन दिलं आहे. कारण, अद्याप अभिनेत्रीचा होणारा नवरा कोण आहे हे तिने उघड केलेलं नाही. त्यामुळे रेश्मा नेमकं कोणाशी लग्न करतेय याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. रेश्माचं दुसरं केळवण अभिनेत्री अनुजा साठे व अभिज्ञा भावे यांनी केलं. या सगळ्यांनी मिळून ‘लगोरी’ मालिकेत काम केलं होतं. तेव्हापासून यांची एकमेकींशी जिवलग मैत्री आहे.

रेश्मा ( Reshma Shinde ) लिहिते, “११ वर्ष झाली… आयुष्यातील चढ-उतार, चांगल्या-वाईट सगळ्या प्रसंगांमध्ये या नेहमी बरोबर होत्या. आता हा आयुष्यातील नवीन प्रवास सुरू करताना त्यांचं बरोबर असणं खूप महत्त्वाचं आहे. या माझ्यासाठी Happy Place आहेत. लव्ह यू अभिज्ञा भावे आणि अनुजा साठे. अर्थात आम्ही मेहुल आणि सौरभला मिस केलं…माझं केळवण”

हेही वाचा : “दोघांचं जमलंय?” भूषण प्रधानच्या वाढदिवशी ‘Love You’ म्हणत अनुषाने लिहिली खास पोस्ट; कमेंट्सचा पाऊस

View this post on Instagram

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रेश्माच्या ( Reshma Shinde ) या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव करत ‘लगोरी’ मालिकेच्या टीमचं रियुनियन पाहून आनंद व्यक्त केला आहे. तसेच अनेकांनी रेश्मा नेमकं कोणाशी लग्न करणार असे प्रश्न देखील कमेंट्समध्ये विचारले आहेत.