अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येला एक आठवडा झाला आहे. अभिनेत्रीने शूटिंगदरम्यान, मेकअप रुममध्ये गळफास घेऊन २४ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येस तिचा को-स्टार आणि बॉयफ्रेंड शिझान खान जबाबदार असल्याचा आरोप अभिनेत्रीची आई वनिता शर्मा यांनी केला होता. त्यानंतर शिझानला अटक करण्यात आली आणि त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. पण अद्याप शिझानकडून यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती पोलिसांना गोळा करता आलेली नाही. अशातच तुनिषाच्या आईने पत्रकार परिषद घेत शिझानवर आरोप केले आहेत.

क्रिती सेनॉनशी अफेअरच्या चर्चांवर प्रभासने पहिल्यांदाच सोडलं मौन; म्हणाला…

तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी मीडियाशी बोलताना शिझान खान आणि त्याच्या कुटुंबावर नवीन आरोप केले आहेत. तिचा दावा आहे की तिची मुलगी त्याच्या कुटुंबासोबत बराच वेळ घालवत होती, तसेच ते तुनिषाला हिजाब परिधान करायला लावत होते. शिझानची आई अनेकदा तुनिषा शर्माशी शिझानच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल बोलायची. “त्याची आई मला खूप त्रास देत आहे,” असं तुनिषाने आपल्याला सांगितल्याचा दावा वनितांनी केला आहे. ‘कोईमोई’ने यासंदर्भात वृत्त दिलंय.

आत्महत्येआधी तुनिषा आणि शिझानमध्ये झालेलं जोरदार भांडण; वळीव पोलिसांच्या हाती लागला पुरावा

तुनिशा शर्मा अनेकदा शिझान खानसोबत दर्ग्यात जात असे. शिझानची कार महिनाभर खराब झाली तेव्हा तुनिषाने तिची कार त्याला दिली होती आणि आपण ड्रायव्हरचं ५० हजार रुपयांचं बिल दिल्याचंही त्या म्हणाल्या. दरम्यान, पत्रकार परिषदेला तिचे काका पवन शर्माही उपस्थित होते. तुनिषाला रुग्णालयात नेण्यास एवढा उशीर का झाला, असा सवाल त्यांनी केला. तसेच तुनिषा शर्माचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला तेव्हा शिझान खाननेच तिचा मृतदेह समोर आणला, असा आरोपही त्यांनी केला. “तिचा खूनही झाला असू शकतो,” असं तिची आई म्हणाली.

“धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर…”, तुनिषाच्या आईचे शिझान खान व कुटुंबियांवर गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुनिषाला शिझानच्या सिक्रेट गर्लफ्रेंडबद्दल कळताच त्याने तिला थप्पड मारली होती. तुनिषाने शिझानची चॅट वाचली होती. तिने त्याला विचारलं असता त्याने थप्पड मारली आणि तुला जे करायचंय ते कर, तुनिषाने हे सर्व काय आहे, असं विचारलं असता त्याच्याजवळ कोणतंही उत्तर नव्हतं,” असं वनिता शर्मांनी म्हटलंय.