स्वप्निल जोशी हा मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमात त्याने आतापर्यंत काम केलं आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्याचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. गेले काही महिने तो ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. तर नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे स्वप्निल जोशी खूप भावूक झालेला दिसला.

‘तू तेव्हा तशी’ या मालिकेच्या माध्यमातून त्याने मोठ्या कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन होतं होतं. या मालिकेत त्याच्याबरोबर शिल्पा तुळसकर, अभिज्ञा भावे, अभिषेक रहाळकर, रुमानी खरे, स्वानंद केतकर, सुहास जोशी, उज्वला जोग, सुनील गोडबोले हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले. या मालिकेची कथा, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांकडून या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. तर मग तिची मालिका संपली. यानिमित्त स्वप्निल जोशीने एक भावूक पोस्ट शेअर करत या मालिकेचा शेवट त्याच्यासाठी खूप कठीण होता असं म्हटलं.

new mom kartiki gaikwad shares unseen video from her baby shower
बाळाच्या जन्मानंतर कार्तिकी गायकवाडने शेअर केला डोहाळे जेवणाचा Unseen व्हिडीओ! म्हणाली, “आईची भूमिका…”
Marathi Actor Gaurav More Again Troll
Video: मल्लिका शेरावतसमोर गौरव मोरेला डान्स करत अंघोळ करताना पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, “लेका लाज काढलीस तू आज…”
Marathi Actor siddharth jadhav meet suresh raina video viral
Video: सिद्धार्थ जाधव व सुरेश रैनाची झाली ग्रेटभेट, क्रिकेटरने अभिनेत्याचं केलं कौतुक; व्हिडीओ व्हायरल
Marathi actor Prasad oak Visit ayodhya ram temple with family video viral
Video: जय श्री राम! प्रसाद ओकने कुटुंबासह अयोध्येतील रामलल्लाचं घेतलं दर्शन, पत्नीने व्हिडीओ केला शेअर
aishwarya narkar recalls while travelling from mumbai local train
“डोंबिवली फास्टमधून प्रवास करताना…”, ऐश्वर्या नारकरांना आठवले जुने दिवस, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…
swapnil joshi children dance on naach ga ghuma song
Video : ‘नाच गं घुमा’ गाण्यावर स्वप्नील जोशीच्या मुलांचा डान्स! व्हिडीओवर मुक्ता बर्वेसह नम्रता संभेरावने केली खास कमेंट
son abram angry on father shah rukh during kkr vs dc ipl 2024 match funny video goes viral on social media
VIDEO : शाहरुखने गळा पकडताच भडकला लेक अबराम; डोळे वटारले आणि मग…? किंग खानची प्रतिक्रिया होतेय व्हायरल
mohan bhagwat Swargandharva Sudhir Phadke
“हा चित्रपट पाहून बाबूजींचा…”, मोहन भागवत यांची ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ सिनेमा पाहिल्यावर प्रतिक्रिया

आणखी वाचा: स्वप्निल जोशी ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या एका भागासाठी आकारतो ‘इतके’ मानधन, किंमत ऐकून व्हाल थक्क

स्वप्निलने या मालिकेच्या शेवटच्या सीनचा एक बिहाइंड द सीन व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं, “शेवट कधीच सोपा नसतो! या मालिकेतील शेवटचा शॉट माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण शॉट्सपैकी एक होता. हा तांत्रिकदृष्ट्या कठीण होता म्हणून नाही, तर संपूर्ण युनिट तिथे उभं राहून आम्हाला पाहत होतं. सगळ्यांच्या डोळ्यात त्यावेळी आनंदाश्रू होते. इथे तयार झालेली नाती आणि हे आनंदाश्रू…आमचे संपूर्ण युनिट आणि आमचं ‘झी’चं कुटुंब. यावेळी सर्वांच्याच डोळ्यात पाणी होतं. आम्ही आमच्या कामाला घरातलंच कार्य समजतो आणि आम्हाला त्याचा अभिमानही वाटतो. कारण आम्ही एकत्र राहतो. आम्ही एकत्र हसतो. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. यापुढे आम्ही किती आपापल्या कामांमध्ये वेगळं असलो तरी आम्ही नेहमीच या कुटुंबाचा एक भाग असू! रंगदेवता आपल्यावर सदैव प्रसन्न राहो! शुभम!”

हेही वाचा : “अचानक मोठी झाली यार…”; लेकीसाठी पोस्ट लिहीत स्वप्निल जोशी भावूक

आता त्याची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. त्याचे फॅन्स या व्हिडिओवर कमेंट करत “आम्ही तुम्हाला खूप मिस करू,” “या मालिकेचा पुढील भाग लवकरच आणा” अशा कमेंट्स करत त्यांचं प्रेम व्यक्त करत आहेत