Tharla Tar Mag Fame Arjun Subhedar : ‘ठरलं तर मग’ मालिकेने गेल्या अडीच वर्षांत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. विशेषत: प्रेक्षकांना अर्जुन-सायलीची जोडी सर्वांना खूपच आवडते. मालिकेत अर्जुनची प्रमुख भूमिका अभिनेता अमित भानुशाली साकारत आहे.

अर्जुनचा रुबाबदार अंदाज, त्याची कोर्टात केस लढण्याची अनोखी पद्धत, बायकोच्या पाठिशी ठामपणे उभं राहणं, त्याचा डॅशिंग लूक या अर्जुनबद्दलच्या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना कायम भावतात. ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळेच सध्या अर्जुन घराघरांत चर्चेत आहे. मात्र, सर्वांचा लाडका अर्जुन आता आणखी एका लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेणार आहे.

‘ठरलं तर मग’ ( Tharla Tar Mag ) मालिकेत अर्जुन नेहमीच सायलीची मदत करताना दिसतो. पण, आता सायली पाठोपाठ अर्जुन सुभेदार ‘स्टार प्रवाह’च्या आणखी एका नायिकेची मदत करणार आहे. त्या नायिकेचं नाव आहे मीरा.

‘साधी माणसं’ मालिकेत मीराची भूमिका अभिनेत्री शिवानी बावकर साकारत आहे. ‘साधी माणसं’ या मालिकेत घराचा लिलाव सुरू असताना अचानक अर्जुन सुभेदार एन्ट्री घेऊन हा लिलाव थांबवणार असल्याचा जबरदस्त सीक्वेन्स पाहायला मिळणार आहे.

अर्जुन मीराचा वकिल म्हणून ‘साधी माणसं’ मालिकेत एन्ट्री घेणार आहे. घराचा लिलाव करणाऱ्यांना तो थेट स्टे ऑर्डर देतो आणि मीराची खूप मोठी मदत करतो. तसेच मीराला त्रास देणाऱ्यांना कायद्याच्या भाषेत उत्तर देतो. मालिकेचा हा जबरदस्त प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अर्जुनची अचानक झालेली डॅशिंग एन्ट्री पाहून त्याचे चाहते थक्क झाले आहेत. अनेकांनी अर्जुन पूर्ण स्टार प्रवाहच्या मालिकांचा वकिल आहे असंही त्याचं कौतुक करत म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘साधी माणसं’ मालिकेचा हा विशेष भाग १० मे रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पाहायला मिळणार आहे. अर्जुनच्या डॅशिंगच अंदाजाचं सर्वांनी कौतुक केलं आहे.