गेल्या काही दिवसांपासून जुन्या मालिका ऑफ एअर होऊन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्याचे सत्र सुरुच आहे. नवनवीन विषयावर आधारित असलेल्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाल्या आहेत. लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता अक्षर कोठारी अभिनीत ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण यामुळे घराघरात पोहोचली प्रेक्षकांची आवडती मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ आता निरोप घेण्यास सज्ज झाली आहे. काल मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस पार पडला. हा शेवटचा क्षण मालिकेतील कलाकारांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला.

हेही वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली…

एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका ऑक्टोबर २०२१ला प्रेक्षकांच्या भेटीस आली. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. अभिनेते शरद पोंक्षे, उदय टिकेकर, चेतन वडनेरे, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, सुप्रिया पाठारे, लीना भागवत, सारिका निलाटकर-नवाथे, नम्रता प्रधान अशा अनेक तगड्या कलाकार मंडळींनी मालिकेतील आपापली पात्र उत्तमरित्या साकारली आहे. त्यामुळेच शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या अशी अनेक पात्र महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 17: अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत झाली भावुक; म्हणाली, “तो खूप…”

या मालिकेला सुरुवातीपासून प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. मालिकेतील ट्विस्ट रटाळवाणे न वाटता प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे होते. त्यामुळे मालिका टीआरपीच्या शर्यतीतही काही मागे नाही. पण आता ‘ठिपक्यांची रांगोळी’ शेवटच्या टप्प्यात आली आहे. काल मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे कलाकारांनी शूटिंगचा शेवटचा दिवस जबरदस्त अंदाजात साजरा केला.

हेही वाचा – मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत ऐश्वर्या राय-बच्चन व सलमान खानने एकमेकांना मारली मिठी? फोटो आला समोर

मालिकेतील कलाकारांनी शूटिंगचा शेवटचा दिवस आठवणीत राहण्यासाठी व्हरांड्यातील रांगोळीत रंग भरले. एकमेकांना खास भेटवस्तू दिल्या. केक कापून सेलिब्रेशन केलं. यावेळी कलाकारांनी मालिकेच शीर्षकगीत गाऊन केक कापला. शिवाय खास जेवणाचा बेतही केला होता.

हेही वाचा – “जगबुडी होईल पण ही मालिका…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “भिकेचे डोहाळे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेच्या वेळेत २० नोव्हेंबरपासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका पाहायला मिळणार आहे. या मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला आहे. गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा दाखवण्यात येणार आहे.