अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी (२४ डिसेंबर) वसईमध्ये मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. शूटिंग सुरू असताना घडलेल्या या घटनेनं मालिकाविश्वात खळबळ उडाली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने तिचा सह-कलाकार बॉयफ्रेंड शिझान खानविरोधात छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिझान खानला अटक करून रविवारी कोर्टासमोर हजर केलं, त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ऑल इंडिया सिने वर्कर असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. “तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करून तपास योग्य पद्धतीने करावा, अशी आमची मागणी आहे. मी तुनिषा शर्माने आत्महत्या केलेल्या, त्या सेटवर गेलो होतो. तिथं मला लोक घाबरलेले दिसले, त्यामुळे नक्कीच तिथं काहीतरी चुकीचं घडलं असावं,” असं सुरेश गुप्ता म्हणाले.

तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला कोठडी, श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू अन्…; गेल्या २४ तासात नेमकं काय घडलं?

“तुनिषा ज्या टेलिव्हिजन शोसाठी शूटिंग करत होती, त्या सेटवर महिला सुरक्षित नाहीत. हा सेट खूप आत असून लोक तिथे ये-जा करायला घाबरतात. सरकारने या प्रकरणाकडे लक्ष द्यावे आणि तुनिषाच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करावी. चौकशीनंतर अनेक गोष्टी बाहेर येतील,” असं गुप्ता यांनी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधी, एका ट्विटमध्ये AICWA ने म्हटलं होतं की, “अलिबाबा’ या मालिकेच्या सेटवर अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली, असं तिथल्या लोकांनी सांगितलं होते. ही घटना नायगाव येथील एका स्टुडिओमध्ये घडली. आम्ही याच्या SIT चौकशीची मागणी करू. चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. देव तिच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर देवो.”