scorecardresearch

Video : वनिता खरातच्या लग्नात ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ कलाकारांचा खास डान्स, ‘दिलबरो’ गाणं लागताच डोळ्यात तरळले पाणी

वनिताच्या लग्नात ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’च्या कलाकारांनी केलेल्या डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

vanita kharat marriage dance cry

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात ही नुकतीच विवाहबंधनात अडकली. वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेशी लग्नगाठ बांधली. मोजके नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आता वनिताच्या लग्नाचे विविध फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. नुकतंच वनिताच्या लग्नात ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’च्या कलाकारांनी केलेल्या डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

वनिता आणि सुमित लोंढे यांच्या लग्नाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यांच्या मेहंदी आणि हळदी सोहळ्यातील फोटोही व्हायरल झाले होते. त्यानंतर आता सोशल मीडियावर वनिता व सुमितच्या लग्नाच्या काही खास क्षणांचे फोटो-व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
आणखी वाचा : Video : प्राजक्ता माळीकडून वनिता खरातला लग्नाची खास भेट, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…

वनिता व सुमितच्या लग्नात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी तिच्या लग्नात खास डान्स केला.

यावेळी या कलाकारांनी ‘बनो रे बनो मेरी चली ससुराल’, ‘नवराई माझी लाडाची’ आणि ‘मुड़ के ना देखो दिलबरो’ या गाण्यांवर डान्स केला. याचे व्हिडीओही त्यांनी शेअर केले आहेत. ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’च्या कलाकारांचा हा डान्स पाहून वनिताच्या डोळ्यात पाणी आले. यावेळी ती रडतानाही पाहायला मिळाली.

आणखी वाचा : मिठी, रोमान्स अन्…; वनिता खरातचं बॉयफ्रेंडसह प्री-वेडिंग फोटोशूट

दरम्यान वनिताने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची साडी नऊवारी साडी, डिझायनर ब्लाऊज आणि पैठणी शेला असा मराठमोळा लूक केला होता. त्याबरोबर तिने पारंपरिक दागिनेही परिधान केले होते. तर सुमितने शेरवानी आणि फेटा बांधत शाही लूक केला होता. त्यानंतर या दोघांनी रिसेप्शनला साडी आणि ब्लेझर असा वेस्टर्न लूक केला होता. यावेळी वनिताने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तर सुमीत हा निळ्या रंगाच्या सूट-बुटात पाहायला मिळाला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 09:50 IST
ताज्या बातम्या