अंकुश चौधरी मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अंकुशसह त्याची पत्नीही कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दीपा परब चौधरी हिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांना आपलसं केलं. झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेच्या निमित्ताने तिने बऱ्याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. या मालिकेमधील ती साकारत असलेली गृहिणीची भूमिका सध्या चर्चेत आहे.

आणखी वाचा – राखी सावंतच्या आईचं जेव्हा निधन झालं तेव्हा नेमकं काय घडलं? भावानेच केला खुलासा, म्हणाला, “त्या रात्री आईला…”

दीपाने ‘तू चाल पुढं’मधील भूमिकेने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. इतर सेलिब्रिटींप्रमाणेच दीपाबाबतही अनेक गोष्टी जाणून घेण्यात तिचे चाहते उत्सुकत असतात. आता तिनेच तिच्या खासगी आयुष्याबाबत काही खुलासे केले आहेत.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दीपाने तिचं शिक्षण किती झालं आहे हे सांगितलं. मुलाखतीमध्ये रॅपिड फायर हा राऊंड सुरू असताना तिला तुझं शिक्षण किती झालं आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ती म्हणाली, “माझं बी.कॉमपर्यंत शिक्षण झालं आहे.” तसेच यावेळी तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला.

आणखी वाचा – Video : उर्फी जावेदचं ‘ते’ कृत्य कॅमेऱ्यात कैद, असा ड्रेस परिधान करत स्वतःच म्हणाली, “तो कोण आहे ज्याने…”

अभिनेत्री नसते तर सीए झाले असते असंही दीपाने यावेळी सांगितलं. दीपा व अंकुशला एक लहान मुलगाही आहे. काही वर्ष दीपा कलाक्षेत्रापासून लांबच राहिली. फक्त घर व संसार सांभळणाऱ्या या अभिनेत्रीने पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे.