जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी बडगामच्या चदूरा येथे कार्यरत लिपिक राहुल भट्ट यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने राहुल भट्ट यांचा मृत्यू झाला. स्थलांतरितांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रोजगार पॅकेज अंतर्गत राहुल यांची नियुक्ती करण्यात आली होती. राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांनी संताप व्यक्त केला आहे. याच हल्ल्याच्या पार्शवभूमीवर चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

आणखी वाचा : ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याप्रकरणी रवीना टंडनची पोस्ट चर्चेत; म्हणाली, “भारत हा एक…”

राहुल भट्ट हे तहसीलदार कार्यालयात कार्यरत असून गुरुवारी ड्युटीवर होते. गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी तहसीलदार कार्यालयात घुसून राहुल भट्ट यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर राहुल यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता.

विनोद कापरी यांनी ट्विटरवर राहुल भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ते म्हणाले, “राहुल भट्टच्या घृणास्पद हत्येबद्दल त्याचे संपूर्ण कुटुंब आणि काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाला पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या मनातली गोष्ट ऐकायची आहे.” विनोद कापरी यांच्या या ट्वीटवर दोन्ही बाजूचे लोक मतं मांडत असताना दिसत आहे. काहींनी कापरी यांचं समर्थन केलंय तर काहींनी त्यांच्यावर टीका केलीय.

आणखी वाचा : लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अमिताभ बच्चन यांना पाहून माधुरीचे पती डॉ नेने, म्हणाले “मी यांना…”

आणखी वाचा : मराठीतला आजवरचा सर्वात BOLD टीझर, तेजस्विनी पंडीतच्या ‘रानबाजार’ची झलक पाहिलीत का?

दरम्यान, राहुल भट्टच्या वडिलांनी सांगितले की, राहुल गेल्या अनेक महिन्यांपासून बदलीसाठी अर्ज करत होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने त्यांच्या अर्जावर विचार केला नाही. “सरकारी कार्यालयात काश्मिरी पंडित सुरक्षित नसेल, तर कुठे आहे? राहुलची पत्नी आणि मुलेही काश्मीरमध्ये आहेत. काश्मिरी पंडितांना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. राहुलला २०११ मध्ये नोकरी मिळाली, पण त्याला चदूरावरून दुसरीकडे बदली हवी होती,” अशी प्रतिक्रिया त्यांच्या वडिलांनी दिलीय.