scorecardresearch

दुबईत साखरपुडा का केला? खुद्द सोनाली कुलकर्णीनेच सांगितले कारण..

सोनाली कुलकर्णीने ७ मे २०२१ रोजी दुबईत कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली.

दुबईत साखरपुडा का केला? खुद्द सोनाली कुलकर्णीनेच सांगितले कारण..
सोनाली कुलकर्णी कुणाल बेनोडेकर

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा विवाहबंधनात अडकली. यावेळी चक्क त्यांनी लंडनमध्ये लग्नाचा घाट घातला होता.

सोनाली कुलकर्णीने ७ मे २०२१ रोजी दुबईत कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली. दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने सोनाली व कुणालचा विवाह पार पडला होता. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या मुहुर्तावर सोनाली व कुणाल पुन्हा एकदा थाटामाटात लग्नबंधनात अडकले. लंडनमध्ये कुटुंबिय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत सोनाली-कुणालचा विवाह सोहळा पार पडला.

एका लग्नाची दुसरी गोष्ट’, सोनाली कुलकर्णी-कुणाल बेनोडेकर यांच्या लंडनमधील विवाहसोहळ्याचे खास फोटो

या सोहळ्याचा व्हिडिओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोनालीने दुबईत साखरपुडा आणि लग्न का केले? असा प्रश्न अनेकांना पडला होता. नुकतंच यावर खुद्द सोनालीने स्पष्टीकरण दिले आहे. यात ती म्हणाली की कुणालचे आई बाबा लंडनमध्ये असतात. कुणाल दुबईमध्ये आणि आम्ही महाराष्ट्रात. त्यामुळे लंडन आणि महाराष्ट्राच्या मधले ठिकाण म्हणून आम्ही दुबईत साखरपुडा करायचा निर्णय घेतला. २ फेब्रुवारी २०२० रोजी अगदी मराठमोळ्या पद्धतीने माझा साखरपुडा पार पडला.

काही दिवसांपूर्वी या व्हिडीओ ट्रेलर प्रदर्शित झाला होता. सोनालीच्या चाहते या व्हिडीओची वाट बघतच होते आणि अखेर तो प्रदर्शित झाला. लग्नाचा संपूर्ण व्हिडीओ प्लॅनेट मराठीवर तीन भागांमध्ये पाहता येणार आहे.

दरम्यान सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांनी ७ मे २०२१ रोजी अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबंधनात अडकले होते. यानंतर लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी त्या दोघांनी पुन्हा एकदा थाटामाटात विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आणि तिने पती कुणाल बेनोडेकरसोबत पुन्हा पारंपरिक पद्धतीने लगीनगाठ बांधली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why marathi actress sonalee kulkarni and kunal benodekar got engagement ceremony in dubai spg

ताज्या बातम्या