News Flash

मुंबईत लोकल ट्रेनच्या महिला डब्यात विकृत तरुणाचे हस्तमैथून

ट्रेन सीएसटीएम स्थानकातून बाहेर पडताच फर्स्ट क्लासच्या डब्यातून एका महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. उतेकर यांनी महिला डब्यात जाळीतून बघितले असता डब्यात महिलेशेजारी एक तरुण बसलेला

उतेकर यांनी त्या विकृत तरुणाचा फोटो पोलिसांना दिला आहे.

मुंबईतील लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हार्बर मार्गावर महिलांच्या डब्यात घुसलेल्या तरुणाने डब्यातील महिला प्रवाशासमोर हस्तमैथून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात महिला प्रवाशाने तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल करता येणार नाही, असे सांगत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.

जितेश उतेकर हे शुक्रवारी हार्बर मार्गावरील सीएसटीएम – पनवेल लोकल ट्रेनने प्रवास करत होते. दुपारी २ वाजून ४२ मिनिटांनी त्यांनी ही ट्रेन पकडली. उतेकर हे फर्स्ट क्लासलगतच्या डब्यातून प्रवास करत होते. दुपारची वेळ असल्याने ट्रेनला फारशी गर्दी नव्हती. ट्रेन सीएसटीएम स्थानकातून बाहेर पडताच फर्स्ट क्लासच्या डब्यातून एका महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. उतेकर यांनी महिला डब्यात जाळीतून बघितले असता डब्यात महिलेशेजारी एक तरुण बसलेला दिसला. ‘हा तरुण माझ्यासमोर विकृत चाळे करत आहे’, असे त्या महिलेने उतेकर यांना सांगितले.

उतेकर व अन्य प्रवाशांनी आरडाओरडा करताच त्या तरुणाने पँटची चेन बंद केली आणि दरवाज्याजवळ जाऊन उभा राहिला. मस्जिद स्थानक येताच त्याने धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरुन पळून गेला.

महिला प्रवासी खूप घाबरल्याने त्या तक्रार दाखल न करताच निघून गेल्या. मात्र, उतेकर हे तक्रार दाखल करण्यासाठी वडाळा रेल्वे पोलिसांकडे गेले. त्यांनी सीएसटीएम पोलिसांकडे जाण्यास सांगितले. सीएसएमटी पोलिसांनी उतेकर यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी दिलेला विकृत तरुणाचा फोटोही पोलिसांना घेतला. मात्र  पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही, असे उतेकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. ज्या महिलेसोबत हा प्रकार घडला त्या तक्रार दाखल करण्यास न आल्याने गुन्हा दाखल करता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले.

तोवर उतेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून तसेच रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांना मेसेजद्वारे घटनेची माहिती दिली होती. त्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरु केल्याचे उतेकर यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 12:22 pm

Web Title: harbour railway 19 year old youth masturbates in front woman inside local train between cstm masjid
Next Stories
1 एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष बेपत्ता, रक्ताचे डाग असलेली कार सापडली
2 गणेशोत्सवात जुगार बंद, चेस-कॅरम पुन्हा सुरू: पोलिसांचा आदेश
3 BLOG: राम नाम सत्य है!
Just Now!
X