मुलगा, सून भाजपच्या जवळ; पत्नी राष्ट्रवादीची शहराध्यक्षा

मुंबई : गेल्या वर्षी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडे साफ दुर्लक्ष करीत मुलाच्या आघाडीचा प्रचार करणाऱ्या आमदार ज्योती कलानी यांचीच उल्हासनगर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून भाजप व राष्ट्रवादीसाठीही कलानी कुटुंबीय अधिक जवळचे असल्याचे अधोरेखित होते.

खुनाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पप्पू कलानी यांच्या मुलाने भाजपला अधिक जवळ केले आहे. भाजपने त्याला अधिकृतपणे पक्षात प्रवेश दिला नसला तरी त्याच्या आघाडीने भाजपशी हातमिळवणी केली आहे. महापालिकेत भाजप-कलानी युतीची सत्ता आहे. उल्हासनगरचे महापौरपद आपल्या पत्नीला मिळावे म्हणून कलानी पुत्र हट्ट धरून बसले आहेत. गेल्याच महिन्यात कलानी कुटुंबीयांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. राष्ट्रवादीने १४ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यात उल्हासनगरच्या अध्यक्षपदी आमदार ज्योती कलानी यांच्या नावाची घोषणा केली आहे.