मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन धीमा मार्ग आणि हार्बरवर पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर रविवारी, १२ जानेवारीला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील. ब्लॉकमुळे लोकल फे ऱ्या पंधरा मिनिटे उशिरानेही धावणार आहेत. हार्बरवरील लोकल फे ऱ्या रद्दच राहतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. पश्चिम रेल्वेवर मात्र रविवारी ब्लॉक घेण्यात आलेला नाही.

  • मध्य रेल्वे मुख्य मार्ग
  • कुठे- माटुंगा ते मुलुंड डाऊन धीमा मार्ग
  • कधी- स.११.२० ते दु. ३.५० वा

परिणाम- डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा ते मलुंड दरम्यान जलद मार्गावर धावेल. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकात लोकल गाडय़ांना थांबा देण्यात येणार आहे. डाऊन धीम्या मार्गावर विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर स्थानकात लोकल थांबणार नाहीत.

  • हार्बर मार्ग
  • कुठे-पनवेल ते वाशी दोन्ही मार्ग
  • कधी- स.११.३० ते सायं ४.०० वा

परिणाम- ब्लॉकमुळे सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर आणि ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर तसेच बेलापूर ते खारकोपर दरम्यानच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येतील. तर ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते वाशी, नेरुळ लोकल फेऱ्या उपलब्ध असतील.