18 January 2018

News Flash

जितेंद्र आव्हाडांनी मुंबई विद्यापीठाला ठोकलं टाळं

रवींद्र वायकर यांनी राजीनामा द्यावा

मुंबई | Updated: August 8, 2017 8:57 AM

दुसरी डेडलाईनही उलटून गेली तरी निकाल लावण्यात अपयश आल्याने सोमवारी रात्री जितेंद्र आव्हाड मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे पोहोचले.

मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला टाळं ठोकलं. उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. विधानसभेत हा मुद्दा मांडणार असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

राज्यपालांनी वाढवून दिलेली ५ ऑगस्टची मुदत उलटून गेली तरी मुंबई विद्यापीठाला अद्याप ४७७ पैकी फक्त २६५ परीक्षांचे निकाल जाहीर करता आले आहेत. दुसरी डेडलाईनही उलटून गेली तरी निकाल लावण्यात अपयश आल्याने सोमवारी रात्री जितेंद्र आव्हाड मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे पोहोचले. आव्हाड यांनी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला टाळं ठोकून निषेध दर्शवला.

‘मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असून परदेशात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. मुंबई विद्यापीठाची देशभरात नाचक्की झाली असून आम्ही मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत हे सांगताना लाज वाटते’ अशा शब्दात आव्हाड यांनी विद्यापीठाच्या कारभारावर टीका केली. दुसऱ्यांदा डेडलाईन उलटल्याने आम्ही प्रतिकात्मक निषेध म्हणून टाळं ठोकलं. विद्यार्थी आणि पालक किती चिडलेत हे विद्यापीठाला दिसणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरुंचा राजीनामा मागणाऱ्या शिवसेनेची नौटंकी सुरु आहे. त्यांनी आधी उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना मातोश्रीवर बोलावून राजीनामा द्यायला सांगितले पाहिजे असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

विद्यापीठाचे रखडलेले निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरूंना ४ जुलै रोजी दिले होते. जवळपास महिनाभराचा अवधी देऊनही ३१ जुलैपर्यंत विद्यापीठाने केवळ १७३ परीक्षांचेच निकाल जाहीर केले. यानंतर विद्यापीठाला पाच ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली. आता विद्यापीठाने १५ ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करु असे आश्वासन दिले आहे.

First Published on August 8, 2017 8:57 am

Web Title: ncp jitendra awhad lockdown mumbai university kalina campus in protest over delay in results
 1. Anil Gudhekar
  Aug 8, 2017 at 3:03 pm
  राष्ट्रवादीलाही टाळे ठोकण्याची प्रॅक्टिस केली वाटते
  Reply
  1. Sachin Kandalgaonkar
   Aug 8, 2017 at 2:59 pm
   हाहाहाहाहा कायतरी अक्कलशून्य रात्री त्या तिथे कला कुत्रा पण नसता सगळं रस्ता सुमसान असतो आणि हा शहाणा जाऊन त्या गेट ला टाळा लावतॊ लोक आता मूर्ख राहिली नाहीत जितेंद्र आव्हाड तुम्ही मुब्रा आणि कालव्याला काय काय दिवे लावले आहेत ते सगळ्यांना माहित आहेत आणि दहीहंडी वर किती पैसे वाया घालवले ते पण माहित आहेत त्याऐवजी ते पैसे शेतकऱ्यांना दिले असते तरी कितीतरी शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली असती सुधार बाबा सुधार नाही तरी चार टाकल्यानं बरोबर घेऊन फिरतोस ते पण राहणार नाहीत बरोबर
   Reply
   1. O
    ovhal
    Aug 8, 2017 at 2:28 pm
    रात्री घराला आतून कडी लावली ? अन त्याची बातमी झाली ?
    Reply
    1. P
     Prasad
     Aug 8, 2017 at 2:21 pm
     पेपर वाल्याना बोलावून मग टाळे ठोकले? आणि सकाळी ते सिक्युरिटी ने तोडून टाकले आणि कचऱ्यात फेकले? हो ना?
     Reply
     1. U
      Ulhas
      Aug 8, 2017 at 12:36 pm
      निषेध म्हणून तुला "भेटलेली" डॉक्टरेट पदवी परत कर.
      Reply
      1. V
       Vishal Patil
       Aug 8, 2017 at 12:31 pm
       भिकारी आव्हाड, अकलेचा कांदा. विद्यापीठाचं गेट झाडायला जा.
       Reply
       1. O
        ovhal
        Aug 8, 2017 at 12:29 pm
        चर्चा करून प्रश्न सोडविता येत नसेल तर ह्याच्या राजकारणाला टाळे ठोका ! रस्त्यावर कपडे काढा ! कोणत्याही विद्यापीठाला टाळे ठोकण्याचा अधिकार ह्याला दिला कोणी ?
        Reply
        1. S
         Shriram
         Aug 8, 2017 at 12:03 pm
         हा सातवी नापास मुल्ला आव्हाड मुंबई विद्यापीठात केव्हा होता ?
         Reply
         1. A
          Ajit
          Aug 8, 2017 at 11:17 am
          हा तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ चाललाय. वेळेवर निकाल जाहीर न झाल्या प्रकरणी दोषींना तुरुंगात टाकलं पाहिजे. आणि जे लोक या सगळ्याचं नियोजन करतात त्यांना सुद्धा.
          Reply
          1. R
           RANE
           Aug 8, 2017 at 10:44 am
           रात्री युनिव्हर्सिटी बंदच असते, आधीच टाळा मारलेला असतं, येडा समजतो का आम्हाला..??
           Reply
           1. Load More Comments