रेल्वे प्रशासनाकडून करोना संक्रमणाचे कारण; मुखपट्टी लावून पादचारी पूल चढताना प्रवाशांची दमछाक

मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या एकीकडे वाढत असताना करोना संक्रमणाचे कारण देत सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील १२८ सरकत्या जिन्यांपैकी १२५ जिने बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मुखपट्टी परिधान करून पादचारी पुलांच्या पायऱ्या चढताना आबालवृद्धांची दमछाक होत आहे.

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच सर्वच महिलांनाही लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वेवरून सध्या साडेपाच लाख, तर मध्य रेल्वेवरून पाच लाख प्रवासी प्रवास करतात. परंतु या प्रवाशांसाठी असलेले सरकते जिने बंदच आहेत. वयोवृद्ध, गर्भवती महिला, अपंग प्रवाशांसह अन्य प्रवाशांच्या सोयीसाठी उपनगरीय स्थानकात सरकते जिने बसवण्यात आले आहेत. सध्या बंद असलेल्या या जिन्यांमुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

सध्या पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार स्थानकापर्यंत ५२ सरकते जिने आहेत. हे जिने करोना संक्र मणाचा धोका होऊ नये म्हणून बंद ठेवण्यात आल्याचे सांगितले. मात्र यातील काही स्थानकांतील जिने पुन्हा सुरू करण्याचा विचार करत असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकू र यांनी सांगितले, तर मध्य रेल्वे उपनगरी स्थानकांत ७६ सरकते जिने असून यातील घाटकोपर स्थानकातील दोन आणि बदलापूर स्थानकातील एकच सरकता जिना सुरू ठेवला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, कु र्ला, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह अन्य काही स्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. तरीही के वळ दोनच स्थानकांतील सरकते जिने सुरू आहेत. परिणामी मास्क परिधान करून पादचारी पुलांच्या पायऱ्या चढताना प्रवाशांना धाप लागते. त्यामुळे मास्क बाजूला करून पूल चढण्याशिवाय प्रवाशांना पर्याय नसतो.

तेव्हा संसर्ग होत नाही का?

करोनाकाळात सरकत्या जिन्यांवरून जाताना संक्र मण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून जिने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जिने काहीसे अरुंद असतात. त्यामुळे या जिन्यांवरून जाताना एकच गर्दी होते. काही प्रवासी जिन्यांच्या वर आणि खाली येणाऱ्या पट्टीचाही आधार घेत असतात. त्यामुळे अनेक प्रवासी हात लावत असल्याने करोनाचा धोका संभवतो. याच कारणाने जिने बंदच ठेवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे  सांगण्यात आले. परंतु अनेकदा कामाच्या येण्या-जाण्याच्या वेळेत गाडय़ा प्रवाशांनी खच्चून भरलेल्या असतात. त्या वेळेस अंतरनियमाचा विचार होतो का, डब्यातही आसन, आधारासाठीचे हॅण्डल, प्रवेशद्वारावर असलेला दांडा यांचे तरी प्रत्येक वेळेस निर्जंतुकीकरण कु ठे होते. मग हे कारण सरकते जिने सुरू करताना का दिले जात आहे, असा प्रश्न आहे.

सर्वच स्थानकांतील सरकते जिने बंदच आहेत. त्यामुळे मास्क घालून पूल चढताना वयोवृद्धांची, गर्भवती महिलांची दमछाक होते. रेल्वेने सरकते जिन्यांची सुविधा पुन्हा सुरू करावी.

– लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ