मुंबई : रेल्वे रुळ, सिग्लन यंत्रणेच्या देखभाल, डागडुजीसाठी मध्य रेल्वे  मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर विक्रोळी स्थानकातील पादचारी पुलासाठी गर्डर उभारण्यासाठी शनिवार मध्य रात्रीपासून रविवार पहाटेपर्यंत विद्याविहार ते मुलुंड स्थानकांदरम्यान पॉवर ब्लॉक असेल. याच काळात वसई-विरार दरम्यान नाईट ब्लॉक घेतला जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

पश्चिम रेल्वे

’ कुठे : वसई ते विरार अप, डाऊन धीमा मार्ग

’ कधी : शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४.३०

’ परिणाम : डाऊन धीम्या मार्गावरील काही लोकल डाऊन जलद मार्गावरून चालविण्यात येतील.

मध्य रेल्वे

’ कुठे : विद्याविहार ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग

’ कधी : शनिवारी रा. १२ ते रविवारी पहाटे ५

’ परिणाम : रात्री २३.१० नंतर डाऊन जलद लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरून धावतील. ब्लॉक काळात दादर, सीएसएमटीवरून सुटणाऱ्या मेल, एक्स्प्रेस विद्याविहार ते मुलुंड दरम्यान पाचव्या मार्गिकेवरून धावतील. ब्लॉक काळात दादर, सीएसएमटीकडे येणाऱ्या अप मेल, एक्स्प्रेस मुलुंड ते विद्याविहार स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेवरून धावतील.

मध्य रेल्वे

’ कुठे : माटुंगा ते मुलुंड डाऊन धीमा मार्ग

’ कधी : स. ११.२० ते दु. ३.५०

’ परिणाम : स. ११ ते दु. ३.४५ दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावरून धावतील. त्या विद्याविहार, कांजुर मार्ग आणि नाहूर स्थानकात थांबणार नाही. मुलुंड स्थानकानंतर त्या पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे स्थानकातून सकाळी ११.२४ ते दुपारी ३.२६ या काळात मार्गस्थ होणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकात थांबतील. तर सीएसएमटीहून १०.४९ ते दु. ३.२१ या काळात सुटणाऱ्या डाऊन जलद, अर्ध जलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, भांडुप आणि दिवा स्थानकात थांबतील.

हार्बर मार्ग

’ कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्ग

’ कधी : स. ११ ते दु. ४

’ परिणाम : सीएसएमटी, वडाळा येथून स. ११.३४ ते दु. ४.२३ या काळात वाशी, बेलापूर, पनवेलसाठी तर स. ९.५६ ते दु. ४.१६ या काळात वांद्रे, गोरेगावसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द असतील. पनवेल, बेलापूर, वाशी येथून स. ९.५३ ते दु. २.४४ या काळात सीएसएमटी, वडाळासाठी तर गोरेगाव, वांद्रे येथून स. १०.४५ ते सं. ४.५८ या काळात वडाळा, सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द असतील. ब्लॉक काळात पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकलसेवा सुरू असेल.