नाशिकहून निघालेल्या या मोर्चाने ठिकठिकाणी मुक्काम केला. मात्र कोणत्याही प्रकारची विद्युत जोडणी उपलब्ध नसल्याने शेतक ऱ्यांजवळ असलेल्या मोबाइलचे चार्जिग होत नव्हते. मात्र अशातही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील करशेत गावातून आलेले लक्ष्मण भसरे हे गृहस्थ सोलरची लहानशी पाटी आपल्या डोक्यावर ठेवून त्याद्वारे मोबाइल चार्जिग करत होते. गेल्या सहा दिवसांत उन्हातून चालत असताना ही सोलर पाटी मी डोक्यावर ठेवतो आणि त्याद्वारे मोबाइल चार्ज करतो असे त्यांनी सांगितले.  इतर सहकाऱ्यांनाही या उपकरणाचा फायदा होण्यासाठी चार्जिगच्या चार जोडण्या या उपकरणाला भसरे यांनी जोडल्या होत्या.