करोनामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणाचा फटका स्पर्धा परीक्षार्थ्यांनाही बसला आहे. शहरांत राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना करोनामुळे पुन्हा गावाकडे परतावे लागले. अभ्यासिका आणि वाचनालयाची पुरेशी सुविधा नसल्याने शहरातील विद्यार्थ्यांचीही अडचण झाली आहे. त्यामुळे अभ्यास कसा करावा, अभ्यास साहित्य कसे मिळवावे, या कठीण काळात मनोबल टिकवून ठेवण्यासाठी काय करावे? असे अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षार्थ्यांना सतावत आहेत.

या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरू’ या विशेष वेबसंवादात आज मिळणार आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील या वेबसंवादात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

याआधी ‘लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरू’ या वेबसंवादात आयएएस अधिकारी दीपक कपूर आणि मनीषा म्हैसकर (प्रधान सचिव, राजशिष्टाचार) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.

सहभागासाठी. https://tiny.cc/LS_SpardhaParikshaGuru_3 या लिंकवर नोंदणी आवश्यक.