scorecardresearch

वांद्रे-वरळी सागरी सेतू वाहतूकीसाठी आणखी सुरक्षित केला जाणार, भीषण अपघातानंतर एमएसआरडीसीला आली जाग

शून्य अपघात हे आमचे उद्दिष्ट असल्याचा दावा करीत अपघातांना आळा घालण्यासाठी नव्या उपाययोजना करण्यात येतील असेही एमएसआरडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वांद्रे-वरळी सागरी सेतू वाहतूकीसाठी आणखी सुरक्षित केला जाणार, भीषण अपघातानंतर एमएसआरडीसीला आली जाग
वांद्रे-वरळी सागरी सेतू वाहतूकीसाठी आणखी सुरक्षित केला जाणार, भीषण अपघातानंतर एमएसआरडीसी आली जाग

मुंबई : वांद्रे-वरळी सागरीसेतूवरील भीषण अपघातानंतर अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) जाग आली आहे. सागरीसेतूवरील सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन त्यात आवश्यक ते बदल करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. शून्य अपघात हे आमचे उद्दिष्ट असल्याचा दावा करीत अपघातांना आळा घालण्यासाठी नव्या उपाययोजना करण्यात येतील असेही एमएसआरडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा… दिवाळीपूर्वी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन? लवकरच तारीख निश्चित होण्याची शक्यता

बुधवारी मध्यरात्री सागरीसेतूवर हा भीषण अपघात झाला. मध्यरात्री २.४० वाजण्याच्या सुमारास एका गाडीचा अपघात झाला. जखमींना आणण्यासाठी तिथे रुग्णवाहिका पोहोचली. पण २.५३ वाजता येथून जाणाऱ्या गाड्यांनी अपघातग्रस्त गाडीसह रुग्णवाहिकेला धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले. या अपघातानंतर सागरीसेतूच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता येथील सुरक्षेचा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येणार आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच या अपघाताचीही स्वतंत्र चौकशी एमएसआरडीसीकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा… भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीची पोलिसांसह चार जणांना धडक

प्रथमदर्शनी यात वाहनचालकाची चूक असल्याचे आढळले आहे. पण नेमके काय घडले आणि यात कोणाची चूक आहे हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होईल असेही या अधिकाऱ्याने सांगितले. पहिला अपघात झाल्यानंतर सात मिनिटांत टोईंग वाहन आणि रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी पोहचली. घटनास्थळी रस्ता रोधक उभे करण्यात आले. पण दुर्दैवाने दुसरा अपघात झाला. आता नेमके हे कसे घडले हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. सागरीसेतू अधिक सुरक्षित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या