मुंबई: मुलुंड येथील मुंबई महानगरपालिकेच्या एम. टी. अगरवाल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये बोगस डॉक्टर उपलब्ध करणाऱ्या जीवन ज्योति चॅरिटेबल ट्रस्टला दिलेले कंत्राट रद्द करण्यात आले असून या संस्थेचे नाव काळ्यायादीत टाकण्यात आले आहे. दरम्यान, या संस्थेने यापूर्वी सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयामध्ये अशाचप्रकारे हलगर्जीपणा केला होता. मात्र त्यावेळी महानगरपालिका प्रशासनाने संस्थेविरोधात कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलुंड येथील एम. टी. अगरवाल रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये डॉक्टर उपलब्ध करण्याचे कंत्राट जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आले होते. अतिदक्षता विभागात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर संस्थेने उपलब्ध केलेले डॉक्टर बोगस असल्याचे उघडकीस आले.

हेही वाचा… मुंबई: आज आणि उद्या समुद्राला मोठी भरती, पावणेपाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार

दरम्यान, यापूर्वीही या संस्थेने सांताक्रुझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयामध्ये अशाप्रकारे हलगर्जीपणा केल्याचे उघडकीस आले होते. जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्टला २०१८ मध्ये २५ डॉक्टर उपलब्ध करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यानुसार एम. टी. अगरवाल रुग्णालयातील अतिदक्षता विभागात १०, कुर्ला के. भाभा रुग्णालयात ७ आणि व्ही. एन. देसाई रुग्णालयात ८ डॉक्टर उपलब्ध करण्यात आले होते. मात्र आता एम. टी. अगरवाल प्रकरणानंतर महानगरपालिका प्रशासनाने ट्रस्टविरोधात कारवाई सुरू केली आहे. ट्रस्टला देण्यात आलेले कंत्राट रद्द करण्यात आले असून ट्रस्टचे नाव काळ्यायादीत टाकण्यात आले आहे, असे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा… मुंबईसह ठाण्यात पुढील तीन-चार तासांत मुसळधार पावसाची शक्यता

जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्टला २०२० मध्ये व्ही. एन. देसाई रुग्णालयातील अतिदक्षता विभागात डॉक्टर उपलब्ध करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. नियमानुसार प्रत्येक पाळीमध्ये दोन डॉक्टर नियुक्त करणे आवश्यक होते. त्यात एक एमडी आणि एक एमबीबीएस डॉक्टरचा समावेश करणे बंधनकारक होते. मात्र ट्रस्टने एमडी डॉक्टर उपलब्ध केले नाहीत, असे आरोग्य विभागातील एका डॉक्टरने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bogus doctor at mumbai municipal hospital organizations providing doctors blacklisted mumbai print news dvr
First published on: 04-07-2023 at 13:39 IST