मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी गोरेगाव येथून 88 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुटख्याच्या मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे. सिद्धप्पा उर्फ सिद्धू शिवयोजप्पा पुजारी (४०) आणि सफन साहब मौल्ला साहब शेख (३३) या आरोपींनी कर्नाटक राज्यातून गुटखा आणल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. आरोपी गुटख्याचे वितरण करण्यासाठी मुंबईमध्ये आले होते.

हेही वाचा : “अनिल परब, उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराचे स्मारक…”; दापोलीतील रिसॉर्टवरुन किरीट सोमय्यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कायद्यानुसार महाराष्ट्रात गुटखा निर्मिती, वितरण आणि विक्रीवर बंदी आहे. या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि एफडीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुटखा व जप्त करण्यात आलेला ट्रक असा एकूण एक कोटी आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी लिलियानगर येथे गुटख्याचा ट्रक घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार सापळा रचून ही कारवाई केली.