मुंबई : महालक्ष्मीच्या सात रस्ता परिसरातील रिषभ ज्वेलर्समध्ये दिवसाढवळ्या दागिने खरेदीचे निमित्त करून आलेल्यांनी बंदुकीच्या धाक दाखवून दोन कोटी रुपयांचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. आरोपींनी मालक आणि कामगाराला मारहाण करून बांधून पलायन केले होते. गुन्हे शाखेने याप्रकरणी मध्य प्रदेशातून २८ वर्षीय आरोपीला अटक केली. याप्रकरणी तपासासाठी गुन्हे शाखेने पाच पथके तयार केली होती. चिंचपोकळी परिसरात वास्तव्यास असलेले व्यावसायिक भवरलाल धरमचंद जैन (५०) यांच्या तक्रारीवरून आग्रीपाडा पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. महालक्ष्मी जवळील सात रस्ता येथील साने गुरुजी मार्गावरील लक्ष्मीदास वाडीत रिषभ ज्वेलर्स दुकान आहे.

हेही वाचा >>> आता ५०० ऐवजी २०० प्रकल्प असल्यास विकासकांच्या संघटनेस स्वयंविनियामक म्हणून मान्यता, महारेराचा महत्त्वपूर्ण निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींनी या दुकानातील २ हजार ४५८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे १ कोटी ९१ लाख ६० हजार किंमतीचे आणि २२०० ग्रॅम वजनाचे १ लाख ७६ हजार किंमतीचे चांदीचे दागिने आणि १५ हजार रुपयांची रोख व एक वायफाय राउटर पळवला होता. तक्रारीनुसार, दोन अनोळखी व्यक्ती रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास दुकानात दागिने घेण्याच्या बहाण्याने आले होते. काही कळण्यापूर्वीच त्यांनी जैन आणि दुकानातील कामगार पुरण कुमारला बंदुक, चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर त्यांना दोरीने बांधून ठेवले. तसेच ठार मारण्याची धमकी देऊन दुकानातील सुमारे दोन कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल लुटला. याबाबत माहिती मिळताच आग्रीपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. सीसी टीव्हीद्वारे महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेतील अधिकारीही समांतर तपास करीत होते.