मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेडवायर याची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी; तसेच विविध अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्यास मध्य रेल्वेकडून परवानगी देण्यात आली आहे.

मध्य रेल्वे

कुठे :  माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर 

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित थांब्यांवर थांबतील. तर, ठाण्यापुढे या जलद लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड ते माटुंगादरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित थांब्यावर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

हार्बर मार्ग

कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर 

कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणाम : हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरील, सीएसएमटी / वडाळा रोड ते वाशी, बेलापूर, पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील सेवा ब्लॉक कालावधीमध्ये बंद असतील. दरम्यान, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्लादरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत.