मुंबई : मुंबईत सोमवारी निचांकी तापमानाची नोंद झाल्यानंतर मंगळवारी मात्र किमान तापमानाचा पारा वाढला. दरम्यान, पुढील तीन – चार दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात मंगळवारी १८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथे २०.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. सांताक्रूझ येथे सोमवारच्या तुलनेत मंगळवारी ४.३ अंशांनी तापमान अधिक नोंदले. तसेच कमाल तापमान कुलाबा येथे ३२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे ३३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हेही वाचा >>> तळोजास्थित गृहप्रकल्प कथित फसवणूक प्रकरण : सदनिका खरेदीदारांच्या दुर्दशेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल

last two days temperature in Mumbai increased and dew in atmosphere has reduced
मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
Mumbai temperature, drop in temperature,
मुंबई : तापमानात घट होण्याची शक्यता
mumbai heat loksatta news
मुंबई : उकाड्यात वाढ
shivaji nagar mumbai pollution
मुंबई : शिवाजी नगरमधील वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ
Mumbai minimum temperature drops,
मुंबईच्या किमान तापमानात घट
Mumbai temperature drops Temperatures recorded at SantaCruz Colaba
मुंबईच्या तापमानात घट; सांताक्रूझ, कुलाबा केंद्रांवर नेहमीपेक्षा कमी तापमानाची नोंद

सांताक्रूझ येथे सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कमाल तापमान २ अंशांनी अधिक नोंदले गेले. पुढील तीन – चार दिवस किमान तापमानाचा पारा चढाच राहील. या कालावधीत तापमान १८-२० अंशादरम्यान राहील. सध्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे. मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उर्वरित महाराष्ट्रात तापमानाचा पारा १४-१६ अंशादरम्यान राहील. दरम्यान, पश्चिमेकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. राज्यातील धुळे येथील कृषी महाविद्यालयात मंगळवारी देशातील सर्वात कमी ४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान मोसमातील सर्वात निचांकी ठरले आहे.

Story img Loader