Mumbai Breaking News Updates, 06 august 2025 : मुंबईतील दादर येथील कबुतरखाना प्रकरणाने आज वेगळेच वळण घेतले. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येनं आंदोलक जमले. त्यांनी तेथील कबुतरखान्यावर टाकण्यात आलेली ताडपत्री फाडली. काही यानंतर आंदोलक आत शिरले व त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प अंतर्गत सफाळा पश्चिमेला जलसार, टेंभीखोडावे व विराथन गावा दरम्यान असलेल्या डोंगरामध्ये बोगदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या विस्फोटांमुळे जलसाल, टेंभीखोडावे व विराथन बुद्रुक या गावांमधील २०० पेक्षा अधिक घरांच्या भिंतीला व फारशीला तडे गेले आहेत. तर पुण्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने मंगळवारी रात्री वसतिगृहातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मुंबई शहर, मुंबई महानगर, पुणे आणि नागपूर शहर आणि परिसरातील अशा महत्त्वाच्या आणि विविध क्षेत्रातील घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून मिळेल.

Live Updates

Mumbai Pune Nagpur Latest News   Updates in Marathi

20:18 (IST) 6 Aug 2025

ठाणे शहरातील टपाल कार्यालयामधील दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन; नागरिकांची मोठी गैरसोय

ठाणे स्थानक परिसरात असलेल्या टपाल कार्यालयांमध्ये दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊनचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...अधिक वाचा
20:09 (IST) 6 Aug 2025

मुंबई गोवा महामार्गाचा पुन्हा मंत्र्यांकडून पाहणी दौरा

सरकारी प्रशासनाकडून रस्त्याच्या कामाची प्रगती जाणून घेण्यासाठी पुन्हा मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे गुरुवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासून पनवेलमधील पळस्पे ते रत्नागिरी (हातखांबा) या पल्यावरील महामार्गाची पाहणी करणार आहेत. ...अधिक वाचा
19:53 (IST) 6 Aug 2025

पनवेल : वर्षभर चोरीची वीज वापरणा-या हॉटेलचालकावर गुन्हा

या हॉटेलचालकाने तब्बल ९ लाख ४८ हजाराची विज चोरी केली असून या चोरीसाठी विज मीटरला छिद्र सुद्धा पाडून मीटरमध्ये छेडछाड केली. ...वाचा सविस्तर
19:22 (IST) 6 Aug 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींना जोडले हात, मुकपणे गेले निघून…

आमदार संजय कुटे व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव येथे आले. ...सविस्तर बातमी
19:09 (IST) 6 Aug 2025

पत्नी व सासरच्या मंडळींकडून छळ, तरुणाचा टोकाचा निर्णय; व्हिडिओ बनवत रेल्वेपुढे…

आत्महत्येपूर्वी चित्रफित तयार करून तरुणाने आपल्या भावला पाठवली. त्यामध्ये तरुणाने टोकाचा निर्णय घेण्यामागील कारण स्पष्ट केले असून दोषींवर कारवाईची मागणी केली. ...सविस्तर वाचा
19:07 (IST) 6 Aug 2025

साजिद शेख हत्या प्रकरणात आणखी दोन आरोपी अटकेत

एकूण चार आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश; पाच जण अद्याप फरार ...सविस्तर बातमी
18:59 (IST) 6 Aug 2025

‘एमपीएससी’: गट-क संयुक्त परीक्षेबाबत महत्त्वाची अपडेट; निकाल जाहीर झाला तरी न्यायालयामुळे…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, ०१ जून, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ चा निकाल दिनांक ०६ ऑगस्ट, २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. ...अधिक वाचा
18:57 (IST) 6 Aug 2025

नोकरीचं आमिष दाखवून लुटले, ११ लाखांची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल

आरोपीने फिर्यादी व्यक्तीस व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे एक क्रिप्टोग्लोबल ही कंपनी असल्याचे सांगून ऑनलाइन टास्क पूर्ण करून पैसे कमावता येतील, असे सांगितले. ...अधिक वाचा
18:49 (IST) 6 Aug 2025

गटारावरील कोसळलेल्या स्लॅबकडे महापालिकेचे दुर्लक्ष

या उघड्या अवस्थेत असलेल्या गटारात रात्री सुमारास कुणीतरी पडून मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. ...वाचा सविस्तर
18:48 (IST) 6 Aug 2025

बँकेतील जनधन खात्याबाबत रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची मोठी घोषणा

पंतप्रधान जन-धन योजना (पीएमजेडीवाय) ही एक सरकारी आर्थिक समावेशनाची योजना आहे. ...सविस्तर बातमी
18:42 (IST) 6 Aug 2025

रानभाज्यांचा महोत्सवात ठाणे जिल्हा परिषदेच्या ‘सीईओं’नी घेतला रानभाजीचा आस्वाद

ठाणे जिल्हा परिषदेच्या 'उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियाना' अंतर्गत औषधी आणि गुणकारी रानभाज्यांचा महोत्सव भरविण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
18:32 (IST) 6 Aug 2025

‘वनतारा’ची दिलगिरी अन् माफीही…

कायदेशीर वर्तन, पारदर्शकता आणि आमच्या काळजीत सोपवलेल्या प्राण्यांचे कल्याण यांना प्राधान्य देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असे या पत्रकात म्हंटले आहे. ...अधिक वाचा
18:22 (IST) 6 Aug 2025

तारापूर मधील उद्योजकांच्या बैठकीत मनसेचा संताप; बैठक उधळण्याचा प्रयत्न

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत उपायोजना आखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि टिमा या कारखानदारांच्या संघटनेची संयुक्त बैठक बुधवारी टिमा सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. ...सविस्तर बातमी
18:12 (IST) 6 Aug 2025

अनियमित खत विक्रेत्यांवर कारवाई! ठाणे ते सिंधुदुर्ग दरम्यान कारवाईचा बडगा

खते ही पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची निविष्ठा आहे. खतांचा योग्य वापर झाला तर उत्पादनात लक्षणीय वाढ होते. ...अधिक वाचा
18:01 (IST) 6 Aug 2025

उल्हासनगर पालिकेच्या अपघातात मरण पावलेल्या शिक्षकाच्या वारसांना ८७ लाखाची भरपाई

शिक्षक राजकुमार मोहनानी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान आपल्या दुचाकीवरून उल्हासनगर क्रमांक तीन येथून सुनीता अपार्टमेंट समोरील रस्त्यावरून चालले होते. ...अधिक वाचा
17:51 (IST) 6 Aug 2025

डोंबिवलीत सोनारपाडा येथे बहिणीची छेड काढण्यावरून हाणामारी

सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास डोंबिवली पूर्वीतील ललित काटा परिसरातील सोनारपाडा भागात हा छेडछाडीचा प्रकार घडला आहे. ...अधिक वाचा
17:49 (IST) 6 Aug 2025

एकटेपणाने घेतला जीव… समाज मात्र नुसता पाहत राहिला!

बुधवारी भल्या सकाळी साडे सात वाजता अंगणात बसलेले गंगाधर हरणे (८०) यांनी पत्नी निर्मला सोबत (७०) टॅफगोर किटकनाशकाची संपूर्ण बाटली प्राशन केली. ...अधिक वाचा
17:45 (IST) 6 Aug 2025

ठाणे : खड्डे भरण्याच्या कामाला अखेर सुरूवात, पालिकेकडून मास्टिंग तंत्राचा वापर करून बुजवले खड्डे

उल्हासनगर शहरातील रस्त्यांची स्थिती दिवसेंदिवस दयनीय होते आहे. अंबरनाथहून उल्हासनगर शहरात प्रवेश करताच प्रवेशद्वारापासून असमान रस्त्यांना सुरूवात होते. ...सविस्तर बातमी
17:36 (IST) 6 Aug 2025

Thane Municipal Corporation : ठाणे पालिकेच्या मॅरेथाॅन स्पर्धेत लाखो रुपयांची रोख बक्षिसे…यंदा स्पर्धेत वेळ निश्चिती तंत्रज्ञानाचा वापर

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी (Sandeep Malvi) यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन मॅरेथाॅन स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. ...वाचा सविस्तर
17:31 (IST) 6 Aug 2025

नारळी पौर्णिमेनिमित्ताने ठाण्यात मोठे वाहतूक बदल

गेल्या अनेक वर्षांपासून कळवा नाका भागात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. ...सविस्तर वाचा
17:10 (IST) 6 Aug 2025

परप्रांतीय व्यक्तीकडून आधी दीड हजार उकळले, नंतर दोन लाखांची मागणी, पाच पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल

फिर्यादी हे कर्नाटक राज्यातील असल्याने त्यांना पोलिसांची नावे माहीत नव्हती. त्यामुळे तक्रारीत पोलिसांच्या नावाचा आणि पदांचा उल्लेख नाही. या गंभीर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर करीत आहे. ...सविस्तर वाचा
16:21 (IST) 6 Aug 2025

पहिली आणि दुसरीच्या पुस्तकात कविता एकच, फक्त चित्र बदलले..

पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये एकच कविता दिसून येतेय. ‘बर्ड्स कॅन फ्लाय’ कवितेचे नाव आहे. यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...वाचा सविस्तर
16:02 (IST) 6 Aug 2025

चंद्रपूरच्या खड्ड्यांचे नवे नाव: ‘इव्हेंट आमदार मार्ग’, काँग्रेसचे आंदोलन

बागला चौक ते कामगार चौक या मार्गावरील खड्ड्यांना प्रतीकात्मक नाव देत ‘इव्हेंट आमदार मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. ...सविस्तर वाचा
15:55 (IST) 6 Aug 2025

सरसंघचालक भागवत म्हणाले, छावा चित्रपट पाहिला का?, मुंडके छाटले तरी धर्म सोडला…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी छावा चित्रपटाविषयी एका भाषणात उल्लेख केला. ...वाचा सविस्तर
15:49 (IST) 6 Aug 2025

नागपूर जिल्ह्यातील सातनवरी ठरणार देशाचे पहिले डिजिटल गाव

येत्या ८ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टिमसह या गावाला भेट देवून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत. ...वाचा सविस्तर
15:39 (IST) 6 Aug 2025

राहुल मोटे राष्ट्रवादीत आले आणि स्थगिती उठली

धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचा एकही आमदार नाही. जिल्ह्यात आमदार नसल्यामुळे निधीबाबतच्या गोंधळात अजित पवार यांनी फारसे लक्ष घातले नव्हते. ...सविस्तर बातमी
15:35 (IST) 6 Aug 2025

रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ चित्रपटाने पटकावले चार पुरस्कार, दीपक पाटील सर्वोत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला होता. ...वाचा सविस्तर
15:33 (IST) 6 Aug 2025

जगप्रसिद्ध क्रिकेटपटू ख्रिस गेलची मिरा भाईंदरमध्ये हजेरी

'प्रो-गोविंदा' स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची अंतिम फेरी वरळीतील एनएससीआय डोम येथे ७, ८ आणि ९ ऑगस्ट रोजी रंगणार असून प्रसिद्ध क्रिकेटपटू ख्रिस गेल ब्रँड ॲम्बेसेडर यांना ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नेमण्यात आले आहे. ...वाचा सविस्तर
15:20 (IST) 6 Aug 2025

फॅटी लिव्हरचे भारतात वाढते संकट! नव्या व फास्टफुड जीवनशैलीचे धोकादायक परिणाम…

विशेषतः मद्यपानाशिवाय होणाऱ्या नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजच प्रमाण देशात झपाट्याने वाढत असून हा आरोग्य क्षेत्रातील नवा धोका असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात बोलले जाते. ...अधिक वाचा
15:14 (IST) 6 Aug 2025

मतिमंद भाऊ बहिणीची अश्लील चित्रफीत काढून व्हायरल केल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित महिलेस अद्याप अटक करण्यात आलेली नाही. ...वाचा सविस्तर

Today’s Nagpur Mumbai Pune News Live Updates in Marathi

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह ६ ऑगस्ट २०२५