Pune Breaking News Updates, 07 August 2025 : राखी पौर्णिमाचा सण तोंडावर आलाय. मुख्यमंत्र्यांच्याच शहरातल्या लाडक्या बहिणी सुरक्षीत नसल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी समोर आला. नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या घटना घडल्या. तर दुसरीकडे भिवंडी येथे मेट्रो मार्गिका निर्माण कामादरम्यान निष्काळजीपणा झाल्याने एका प्रवाशाच्या डोक्यात लोखंडी सळई शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता ठाणे शहरातील धोकादायकरित्या मेट्रो मार्गिकेच्या सुरु असलेल्या कामांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. तसंच भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार कुख्यात गुंड अबू सालेम याने २५ वर्षे प्रत्यक्ष तुरुंगवास भोगणे अपेक्षित आहे, परंतु शिक्षेतील माफीचा अथवा सवलतीचा कालावधी समाविष्ट केल्यास सालेमला ६० वर्षे तुरुंगात राहावे लागेल. त्यानंतरच त्याची सुटका करण्यात येईल, असा दावा सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात केला.
तेव्हा मुंबई शहर, उपनगर, मुंबई महानगर, पुणे आणि नागपूर शहर परिसरातील विविध महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून मिळेल.
Mumbai Pune Nagpur Latest News Updates in Marathi
कबुतरांचा मुद्दा धार्मिक करू नका; शिवसेनेच्या (शिंदे) मनीषा कायंदे यांचा सरकारलाच घरचा आहेर
साडेपाच लाख रुपयांत बाळाच्या विक्रीचा प्रयत्न फसला; दोन महिलांना अटक
बीडीएस प्रणाली महिनाभरापासून बंद; राज्यातील आठ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काची ठेव अडकली
मुंबईतील १४९ दुकानांचा ई लिलाव १२ ऑगस्टपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कॅब व रिक्षा चालकांच्या मुळावर उठले; महाराष्ट्र कामगार सभेद्वारे...
कोकण रेल्वेच्या 'या' सेवाला अत्यल्प प्रतिसाद; सेवा बंद होऊ नये, म्हणून कोकण रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
तेरा वर्षाच्या मुलीने उघड केला वडिलांच्या हत्येचा कट; आईसह प्रियकरावर गुन्हा दाखल
वसई-विरार महापालिका माजी आयुक्त अनिल पवार यांचे ईडीसमोर स्पष्टीकरण
मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा लांबणीवर
दादर स्थानकात साडेसहा लाखांचा दोन टन गुटखा जप्त
वैद्यकीय, दंत अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकात बदल; ८ ऑगस्टपासून पसंतीक्रम भरण्यास होणार सुरुवात
बीबीए, बीसीए, बीएमए अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला ८ ऑगस्टपासून सुरुवात
भांडणाच्या रागातून १८ वर्षांच्या तरूणाची हत्या; दोन आरोपींना अटक, अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी
आधी बलात्काराचा गुन्हा, मग १ कोटीची खंडणी; आयटी तज्ञाला फसविणाऱ्या महिलेला अटक
मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ; पालिकेच्या औषध फवारणीवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह...
मध्य रेल्वेची विनातिकीट प्रवाशांकडून ८६.७३ कोटींची दंडवसुली; चार महिन्यांत १४.४३ लाख प्रवाशांना पकडले
जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयातील कर्मचाऱयांचे आंदोलन; शाळेच्या प्रवेशद्वारावर ११ ऑगस्टपासून आंदोलन
भामा आसखेड जलवाहिनीला वीजखांबांचा अडथळा; पिंपरी महापालिका ३०० खांब हटविणार
Rakshabandhan 2025: रक्षाबंधन सणानिमित्त एसटीच्या ९१ जादा बसगाड्या
आरएसएसने शताब्दी वर्षासाठी मुस्लीम धर्मगुरुंना निमंत्रण दिले, मात्र, पाकिस्तान, बांग्लादेशावर बंदी का घातली?
डहाणू शहरातील विकास आराखड्यातील रस्त्याला विरोध कायम
शिवभोजन केंद्रांचे अनुदान थकले, १५ केंद्रे पडली बंद!
वसईच्या कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेच्या सणाची लगबग
घोडबंदर मार्गांवर अवजड वाहनांना तीन दिवस बंदी; ८ ते ११ ऑगस्ट पहाटेपर्यंत वाहतुकीत बदल, पोलिसांकडून आधीसूचना जारी
कोकण रेल्वे मार्गावर रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या धावणार
पायाभूत चाचणीची समाजमाध्यमांत पेपरफुटी
डहाणूतील चंद्रसागर खाजणातील कांदळवनासाठीचे अडथळे दूर; भराव टाकणाऱ्यांवर कारवाई नाहीच
"रामदास कदमांनी माझे दोन वेळा पाय धरले, वाघ नाही तर ते बिबट्या आहेत", आमदार भास्कर जाधव यांची टीका
कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिसांचा साताऱ्यात कर्तव्य मेळावा
मुंबई पुणे नागपूर न्यूज ७ ऑगस्ट २०२५