Maharashtra Rain Updates : मुंबईत सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणे जलमय झाली. दरम्यान, मंगळवारी दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या कालावधीत सुमारे ४.८८ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तसेच, हवामान विभागाने आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्महत्या केल्याच्या दिवशी वैष्णवीला सासरकडील लोकांकडून मारहाण झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून मिळाली आहे. शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर २९ जखमा आढळल्या आहेत. मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरांतील, परिसरांतील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या

Live Updates

Mumbai Pune Nagpur Breaking News Updates, 27 May 2025

00:02 (IST) 28 May 2025

शुक्रवारपासून पाऊस कमी होण्याची शक्यता

१९६२ नंतर प्रथमच मोसमी वारे २९ मेपूर्वी पुण्यात दाखल होत विक्रमी स्थिती नोंदली गेली. यानंतर शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ...सविस्तर वाचा
22:37 (IST) 27 May 2025

अंशकालिन निदेशकांच्या नियुक्तीचे सुधारित धोरण

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने अंशकालिन निदेशकांची नियुक्ती, मानधन, शैक्षणिक पात्रता आणि कायम संवर्ग निर्मिती याबाबत आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवालास शासनाने मान्यता दिली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालिन निदेशकांच्या नियुक्तीसाठी कायम संवर्ग निर्माण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यानुसार १०० पेक्षा जास्त पटसंख्येच्या शाळेसाठी कला, क्रीडा व कार्यानुभव विषयासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण तीन अंशकालिन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण केला जाईल. अंशकालिन निदेशकांच्या मानधनाबाबत समग्र शिक्षा योजनेमध्ये तरतूद आहे. त्यामुळे अंशकालिन निदेशकांच्या मानधनापोटी येणाऱ्या पुढील दहा महिन्यांसाठीच्या ८५ कोटी ८० लाख रूपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. अंशकालीन निदेशकांना ४८ तासिकांच्या अध्यापनाकरिता १२ हजार रूपये मानधन देण्यात येईल.

22:37 (IST) 27 May 2025

गाबित समाजासाठी महामंडळाचे आश्वासन

मुंबई : गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध समाजासाठी स्थापन करण्यात आलेली बहुतांश आर्थिक विकास महामंडळे अद्याप कागदावर असताना महायुतीच्या सरकारने कोकणातील गाबित समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात गाबित समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याबाबत चर्चा झाली. विविध समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत तसेच मुंबईत प्रामुख्याने गाबित समाजाचे वास्तव्य आहे. या समाजाच्या सर्वांगीण आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारकडून सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे सावे यांनी यावेळी सांगितले.

21:14 (IST) 27 May 2025

महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायची लाज वाटते - ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांची उद्विग्नता

‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी मसाप जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना भटक्या-विमुक्त समाजाची दुरवस्था, राजकीय जातीयवाद आणि सामाजिक अन्यायावर तीव्र उद्गार काढले. ...वाचा सविस्तर
20:45 (IST) 27 May 2025

राजकीय नेत्यावर गोळीबार प्रकरणात तिघांना अटक

शिवसेना (शिंदे गट) युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश घारे यांच्या कारवर झालेल्या गोळीबारप्रकरणी वारजे पोलिसांनी तिघांना अटक केली असून, हे प्रकरण शस्त्र परवाना मिळवण्यासाठी रचलेला बनाव असावा, असा पोलिसांचा संशय आहे. ...वाचा सविस्तर
20:44 (IST) 27 May 2025

रस्ता ओलांडणे जिकिरीचे, पिंपरी महापालिकेच्या सर्वेक्षणात ८७ टक्के पादचाऱ्यांचे मत

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्बन स्ट्रीटस्केप्स प्रकल्पाअंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ८७ टक्के नागरिकांनी रस्ता ओलांडताना असुरक्षित वाटते, असे सांगितले. ...वाचा सविस्तर
20:35 (IST) 27 May 2025

पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर मुंबई विमातळावर बॉम्बस्फोटाची धमकी, अंधेरीतून ताब्यात घेतलेल्या आरोपीला नोटीस देऊन सोडले

मुंबई विमानतळावरील विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या. याप्रकरणी एका संशयीताला अंधेरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून या संशयीताला नोटीस देऊन सोडण्यात आले. ...अधिक वाचा
20:22 (IST) 27 May 2025

मुसळधार पावसातही पश्चिम रेल्वे धावली… पूर्वपावसाळी कामे आणि तांत्रिक सुधारणांमुळे पाण्याचा निचरा

मुंबईमध्ये सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. सखलभाग पाण्याखाली गेले आणि रस्त्यांवरील वाहतूक मंदावली, तर मध्य रेल्वेचे वेळापत्रक पार कोलमडले. ...अधिक वाचा
19:30 (IST) 27 May 2025

पावसाच्या तडाख्याने मध्य रेल्वेच्या ३०० लोकल फेऱ्या रद्द, मंगळवारीही लोकल विलंबाने धावल्या

मुख्य आणि हार्बर मार्गावरील सुमारे ३०० लोकल फेऱ्या रद्द, तर ४०० लोकल विलंबाने धावल्या. ...सविस्तर वाचा
19:15 (IST) 27 May 2025

जामिनावरील गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर, वा़ढत्या दहशतीच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी पाचारण

गेल्या काही दिवसात अंबरनाथ आणि आसपासच्या भागातून ३० हून अधिक जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते आहे. ...सविस्तर वाचा
18:13 (IST) 27 May 2025

दक्षिण मुंबईतील अनेक भागांमध्ये बुधवारी पाणीपुरवठा बंद

महानगरपालिकेने पाणीपुरवठा योग्य आणि सुरळीत करण्यासाठी विविध कामे हाती घेतली आहेत.बुधवारी सकाळी १० ते गुरुवारी सकाळी १० या कालावधीत ‘ए’, ‘बी’, ‘ई’ आणि 'एफ दक्षिण' विभागांतील काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. ...अधिक वाचा
18:09 (IST) 27 May 2025

पीएमपी बसमध्ये आता ‘एआय’ कॅमेऱ्यांची ‘नजर’, केंद्राकडे प्रस्ताव दाखल, प्रवासी सेवेचा दर्जा सुधारण्यास आणि गैरप्रकार रोखण्यास मदत होणार

येत्या काही दिवसांत दिल्लीतील शिष्टमंडळासमोर याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. ...सविस्तर वाचा
17:58 (IST) 27 May 2025

गृहनिर्माण सोसायट्यांच्या वाहनतळात विद्युत वाहनांसाठी चार्जिंग सुविधा बंधनकारक

भविष्यातील निवासी, व्यावसायिक गृहनिर्माण संस्थांना विद्युत वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
17:48 (IST) 27 May 2025

पावसात जखमी झालेल्या पक्ष्यांना जीवदान

मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका प्राण्यांनाही बसला असून अतिवृष्टीमुळे जखमी झालेल्या ३० हून अधिक प्राण्यांचे प्राण वाचविण्यात प्राणिमित्रांना यश आले आहे. ...वाचा सविस्तर
17:19 (IST) 27 May 2025

मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी मध्यरात्री माजिवडा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद

वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम ठाण्यात सुरू आहे. २८ मे ते १ जून या कालावधीत माजिवडा मेट्रो स्थानक निर्माण कामे केली जाणार आहे. ...सविस्तर बातमी
17:18 (IST) 27 May 2025

कामावर बराच काळ अनुपस्थित राहणाऱ्यांसाठी न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय...

एखादा कर्मचारी न सांगता बराच काळ कामावर गैरहजर राहत असेल तर या कृत्याला राजीनामा दिला असेच म्हणता येईल,असा निर्वाळ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणाचा निर्णय देताना दिला. ...सविस्तर बातमी
17:07 (IST) 27 May 2025

न्या. भूषण गवईनंतर विदर्भातील आणखी एक न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयात…

मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या रूपाने विदर्भाचे आणखी एक प्रतिभासंपन्न सुपुत्र सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी विराजमान होणार आहेत. ...वाचा सविस्तर
16:01 (IST) 27 May 2025

नागपुरातून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडे कोण आहेत?

भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर ही महिला भारत-पाक नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेली होती. ...सविस्तर वाचा
15:46 (IST) 27 May 2025

११ वर्षांनंतर गोंदिया जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

सहकारी बँकेच्या या निवडणुकीत ८९४ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत, २६ मे ते ३० मे पर्यंत फॉर्म जमा करण्याची कालावधी आहे. ...वाचा सविस्तर
15:34 (IST) 27 May 2025

वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, १७ दिवसात १० ठार

ही घटना वनविकास महामंडळाच्या कम्पार्टमेंट नंबर ५२४ मध्ये मंगळवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान भगवानपूर येथे घडली. ...अधिक वाचा
15:23 (IST) 27 May 2025

लोणावळ्यात वाहन वळविण्याच्या कारणावरून पर्यटकाचा खून; दोघे जखमी

ही घटना रविवारी (२५ मे) रात्री लोणावळ्याजवळील कार्ला फाट्याजवळील दहिवली गावातील एका फार्महाऊसजवळ घडली. ...सविस्तर वाचा
14:44 (IST) 27 May 2025

Maharashtra Monsoon Updates : मान्सूनचा प्रवास आजपासून रखडणार! इंग्लंडमधील हवामान तज्ज्ञांनी सांगितले कारण…

दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे. ...वाचा सविस्तर
14:33 (IST) 27 May 2025

ऑपरेशन सिंदूरनंतर समाजमाध्यमावरून देशविरोधी संदेश, पुण्यातील विद्यार्थिनीला तुम्ही गुन्हेगार केले आहे, उच्च न्यायालयाकडून सरकार, महाविद्यालयाची कानउघाडणी

विद्यार्थिनीवरील कारवाईची भूमिका कट्टपंथी असून त्यामुळे तुम्ही तिला गुन्हेगार केले आहे, अशी टीकाही न्यायालयाने केली. ...सविस्तर वाचा
14:13 (IST) 27 May 2025

मोदी सरकारने नागपूर शहराचा निधी का रोखला?

केंद्र सरकारकडून २७० कोटींचा निधी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचा परिणाम शहरात सुरू असलेल्या विकासकामांवर होत आहे. ...अधिक वाचा
14:00 (IST) 27 May 2025

‘वॉटर हिरों’चे ‘कॉफी विथ कलेक्टर’, नेमकी योजना काय?; जलसंधारणासाठी…

गावाच्या प्रतिनिधींसह जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी ‘कॉफी विथ कलेक्टर’ हा विशेष कार्यक्रम घेतला. ...सविस्तर वाचा
14:00 (IST) 27 May 2025

६३ झोपु योजना राबविणाऱ्या पालिकेकडून परवडणाऱ्या घरांना फाटा?; अधिमूल्य अधिक देणाऱ्या विकासकामाला प्राधान्य

झोपु योजना पूर्ण करण्याबरोबरच परवडणारी घरे निर्माण करण्याचाही राज्य शासनाचा हेतू आहे. मात्र या हेतूला पालिकेने फाटा दिला आहे. ...सविस्तर वाचा
13:21 (IST) 27 May 2025

करोना रुग्णांची संख्या वाढतेय, पण घाबरण्याचे कारण नाही; तज्ज्ञ डॉक्टरांचा नागरिकांना सल्ला…

मागील काही दिवसांपासून बाह्यरुग्ण विभागामध्ये ताप आणि खोकल्याचा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ...अधिक वाचा
13:18 (IST) 27 May 2025

यवतमाळ: प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांच्या विक्रीत शेतकऱ्यांचा वापर

शेतकऱ्यांना गळाला लावून अनेक बियाणे कंपन्या व दलाल त्यांचा वापर आता बोगस बियाणे विक्रीच्या साखळीत करत असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला आहे. ...अधिक वाचा
13:04 (IST) 27 May 2025

जिल्ह्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा २०२५ टक्के जास्त पाऊस; पुढील दोन दिवस मुसळधार शक्यता?

पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार, त्यानंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...सविस्तर वाचा
13:03 (IST) 27 May 2025

कल्याण पूर्वेत दोन दिवसांत चेन्नई कित्त्याच्या माध्यमातून ३३५ टन कचऱ्याचे संकलन

पालिका हद्दीतील कल्याण, डोंबिवलीतील सात प्रभागांमध्ये सुमित एल्कोप्लास्ट कंपनीच्या माध्यमातून कचरा संकलनाचे काम गेल्या दहा दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. ...सविस्तर बातमी

nagpur mumbai pune latest marathi news today in marathi

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे