मुंबई : मुस्लीम समाजाचा ईद हा सण आनंदात साजरा व्हावा म्हणून आज अक्षय्य तृतीयाला राज्यात कुठेही आरत्या करू नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना करून भोंग्यांबाबत उद्या भूमिका स्पष्ट करणार असल्याचे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्वीटच्या माध्यमातून कळविले आहे. मशिदींवरील भोंगे हटविले  नाहीत तर अक्षय्य तृतीयाला मंदिरांसमोर आरत्या करण्याची सूचना राज ठाकरे यांनी आधी केली होती. कोणत्याही सणात बाधा आणायची नाही. ईदचा सण आनंदात साजरा करण्याकरिताच आधी ठरल्याप्रमाणे कुठेही आरत्या करू नका, अशा सूचना ठाकरे यांनी केली आहे.  भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. त्याबाबत पुढे काय करायचे हे उद्या स्पष्ट करीन, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.