मुंबई : मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात सोमवारी १२ आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. या प्रकरणात विशेष न्यायालयाने १३ जणांना दोषी सिध्द केले होते. त्यांची बॉम्बस्फोटात खालील प्रमाणे भूमिका असल्याचा आरोप आहे.

१. कमाल अहमद मोहम्मद वकील अन्सारी (मयत)

  • पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांना नेपाळ सीमेवरून मुंबईत आणले
  • स्फोटक साहित्य खरेदी केले
  • माटुंगा स्थानकाजवळ स्फोट झालेल्या ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवला
  • पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले
  • २०२१ मध्ये निधन

२. डॉ. तन्वीर अहमद मोहम्मद इब्राहिम अन्सारी

  • पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले
  • मोहम्मद फैसलच्या घरी कट रचण्याच्या बैठकीला उपस्थित
  • गोवंडीतील मोहम्मद अलीच्या घरी बॉम्ब तयार करताना उपस्थित

३. मोहम्मद फैसल अताउर रहमान शेख

  • दोन वेळा पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले
  • इतर तरुणांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले
  • स्वतःच्या घरी कट रचण्याच्या बैठकीचे आयोजन केले
  • पाकिस्तानातून आलेल्यांना लपवून ठेवले
  • हवाला मार्गे पैसे घेतले
  • गोवंडीतील मोहम्मद अलीच्या घरी बॉम्ब तयार करताना उपस्थित
  • जोगेश्वरी स्थानकाजवळ स्फोट झालेल्या ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवला

४. एहतशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी

  • फैसलच्या घरी झालेल्या कटाच्या बैठकीत सहभागी
  • लोकल ट्रेनची रेकी केली
  • महाराष्ट्रातील सिमीचा सहसचिव
  • गोवंडीतील मोहम्मद अलीच्या घरी बॉम्ब तयार करताना उपस्थित
  • मिरा रोड स्थानकाजवळ स्फोट झालेल्या ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवला
  • पाकिस्तानातून आलेल्यांना मुंब्र्यात नेले

५. मोहम्मद माजिद मोहम्मद शफी

  • पाकिस्तानातून आलेल्यांना बांगलादेश सीमेवरून मुंबईत आणले
  • बॉम्बस्फोटानंतर त्यांना परत बांगलादेशला नेले

६. शेख मोहम्मद अली आलम शेख

  • पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले
  • गोवंडीतील स्वतःच्या घरी बॉम्ब तयार करण्यासाठी जागा दिली

७. मोहम्मद सजिद मर्गुब अन्सारी

  • बॉम्बस्फोटासाठी वापरलेली इलेक्ट्रिक सर्किट त्याने तयार केली

८. अब्दुल वहिद दिन मोहम्मद शेख

  • पाकिस्तानातून आलेल्यांना लपवण्यासाठी मुंब्र्यातील स्वतःचा घर दिले

९. मुजम्मिल अताउर रहमान शेख

  • पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले
  • फैसलच्या घरी झालेल्या कटाच्या बैठकीत सहभागी
  • लोकल ट्रेनचे निरीक्षण केले

१०. सोहैल महमूद शेख

  • पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले
  • फैसलच्या घरी झालेल्या कटाच्या बैठकीत सहभागी
  • लोकल ट्रेनची रेकी केली

११. झमीर अहमद लतीफ रहमान शेख

  • पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले
  • फैसलच्या घरी झालेल्या कटाच्या बैठकीत सहभागी

१२. नवेद हुसेन खान रशीद हुसेन खान

  • गोवंडीहून वांद्रे पर्यतं बॉम्ब नेण्याचे काम केले.
  • खार स्थानकाजवळ स्फोट झालेल्या ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवला
  • ट्रेनची रेकी केली
  • गोवंडीतील मोहम्मद अलीच्या घरी उपस्थित होता

१३. आसिफ खान (बशीर खान यांचा मुलगा)

  • फैसलच्या घरी झालेल्या कटाच्या बैठकीचे आयोजन केले
  • स्फोटक सामग्री खरेदी केली
  • बोरिवली स्थानकाजवळ स्फोट झालेल्या लोकल ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवला
  • लोकल ट्रेनची रेकी केली