साबण आणि पाण्याच्या आधारावर निर्मिती; स्वामित्व हक्कासाठी अर्ज दाखल

अल्कोहोल आधारित हँडवॉश हे ज्वलनशिलतेमुळे तसेच वारंवार वापरामुळे येणाऱ्या त्वचेच्या कोरडेपणामुळे मर्यादित वापरासाठीच योग्य ठरतात. मात्र, जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभाग व संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. रवींद्र चौधरी यांच्या पथकाने सी-मॅटचे माजी महासंचालक डॉ. दिनेश अंमळनेरकर यांच्यासोबत मिळून पर्यावरण अनुकूल आणि बिनविषारी हँडवॉशचे सूत्र तयार केले आहे.

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हातांच्या स्वच्छतेला अत्याधिक महत्त्व देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या पद्धतीत अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर तसेच साबण आणि पाणी याचा समावेश आहे. साबण व पाण्याने हात धुण्याच्या परिणामकारकतेबाबत चिंता व्यक्त के ली जात असताना हे पर्यावरणपूरक हँडवॉश उपयोगी ठरण्याची शक्यता आहे. सुगंधी औषधी वनस्पतीमिश्रित संभाव्य ‘अँटीव्हायरल नॅनोमेटल कम्पाउंडसह’ प्राणघातक सूक्ष्म जीवांचा वेगाने नायनाट करणारे पर्यावरणास अनुकू ल असे या हँडवॉशचे सूत्र  आहे. जागतिक आरोग्य संघटनेने फवारणी करून आणि वारंवार स्पर्श होणारे पृष्ठभाग पुसून निर्जंतुकीकरण करण्यासाठी एक टक्के सोडियम हायपोक्लोराईट ब्लिचचा वापर करण्याची शिफारस के ली आहे. विशिष्ट परिस्थितीत ७० टक्के अल्कोहोलचा वापर सुचवला आहे. बहुतेक विषाणू आणि जिवाणू विरुद्ध सौम्य सोडियम हायपोक्लोराईट ब्लिच पर्याय स्वस्त आणि वेगाने काम करीत असले तरी त्याच्या संपर्कानंतर त्वचा आणि श्लेष्मल त्वचेसाठी ते हानीकारक ठरते. नॅनो-बायोसायन्स तंत्राचा वापर करून या पथकाच्या सदस्यांनी रेशीम धाग्यांवर आधारित नॅनो मटेरियल्ससह जैव सुसंगत आणि पर्यावरणपूरक घातक जंतूचा नाश करणारे सूत्र विकसित के ले आहे. डॉ. मोहन दिवाण यांनी के लेल्या सहकार्यामुळे या दोन्ही संशोधनाचे तात्पुरते स्वामित्व हक्क अर्ज दाखल के ले आहेत.  या संशोधनाच्या यशस्वीतेबद्दल शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळा जुन्नरचे विश्वस्त अँड संजय काळे, श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथील प्राचार्य डॉ. सी.आर. मंडलिक यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

अपायकारक रसायनांचा वापर नाही

रोगनिर्मूलन क्षमता आणि पाण्यावर आधारित जंतुनाशकांची पर्यावरण पूरकता  प्रयोगशाळेत सिद्ध केली आहे. अशाप्रकारची रचना खाद्यपदार्थ तसेच मुलांच्या खेळणी स्वच्छतेसाठी सुरक्षितपणे वापरली जाऊ शकते, असे डॉ. रवींद्र चौधरी म्हणाले. अशाप्रकारचे जंतुनाशक नियमित वॉशिंग पावडरसोबत वापरता येतात. जेणेकरून कपडे धुताना अतिरिक्त सूक्ष्मजीवनावश्यक क्रि या होऊ शकेल, असे डॉ. प्रमोद माने यांनी सांगितले. हँडवॉश हे अपायकारक रसायनांवर आधारित नसून पाण्यावर आधारित आहे. त्यातील घटक पूर्णपणे जैव सुसंगत आहेत, असे डॉ. दिनेश अंमळनेरकर यांनी सांगितले.