अकोला : धावत्या गाडीतून रेल्वे फलाटावर १५ वर्षीय मुलीने उडी मारली. ती खाली पडून रेल्वेखाली जाणार असल्याचे पाहून क्षणार्धात सर्वांच्याच काळजाचा ठोका चूकला. मोठा अनर्थ होणार असल्याचे लक्षात येताच कर्तव्यावर असलेले ‘आरपीएफ’चे पोलीस निरीक्षक युसूफ खान यांनी प्रसंगावधान राखत उडी मारून मुलीचा जीव वाचवला. ही घटना अकोला रेल्वेस्थानकावर घडली. या घटनेची चित्रफीत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहे.

हेही वाचा – CBSC Exam 2024: सीबीएसईच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सूचना

हेही वाचा – नागपूर: गर्भवती महिलेची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या, परिसरात मात्र घातपाताची चर्चा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकोला आरपीएफचे पोलीस निरीक्षक युसूफ खान व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी रेल्वे फलाटावर कर्तव्यावर होते. यावेळी फलाट क्रमांक एकवर आलेल्या पुरी-ओखा सुपरफास्ट एक्सप्रेसमधील आरक्षित डब्यातून कोमल कोळी (१५) नामक मुलीने गाडी धावत असतानाच फलाटावर उडी मारली. मुलीचा तोल जाऊन ती खाली पडली. ती धावत्या बोगी खाली जाण्याची शक्यता असल्याने पोलीस निरीक्षक युसूफ खान व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी उडी मारून मुलीला बाजूला केले. त्यामुळे मुलीचा जीव वाचला व सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. आरपीएफ पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.