औषधविक्रेत्या तरूणीला शीतपेयातून गुंगीकारक औषध पाजून बेशुद्ध झाल्यानंतर सहकारी युवकाने बलात्कार केला. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर प्रकार उघडकीस येताच तिने पोलिसात तक्रार दिली. संकेत संजय चन्ने (३१) रा. दत्तवाडी असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी संकेत चन्ने हा मुळचा चंद्रपूर येथील रहिवासी आहे. संकेत आणि पीडित तरूणी सोबतच ‘एमआयडीसी’तील एका औषध निर्मात्या कंपनीत कामाला लागले. मे २०२० मध्ये संकेतने तरूणीला आपल्या खोलीवर भेटायला बोलावले. तिच्या शीतपेयात गुंगीचे औषध टाकले. पेय प्यायल्यानंतर ती बेशुद्ध पडली.

संकेतने ती बेशुद्धावस्थेत असताना तिचे मोबाईलने नग्न छायाचित्र काढले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. दोन तासानंतर तरूणी शुद्धीवर आली. तिच्या अंगावर कपडे नसल्यामुळे ती घाबरली. झालेला प्रकार लक्षात येताच तिने संकेतला फटकारले. त्यानंतर ती तडकाफडकी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली. त्यामुळे संकेत घाबरला. पोलीस अटक करतील या भीतीपोटी तो तिच्या मागावर पोलीस ठाण्यापर्यंत गेला. संकेतने माफी मागत लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळे ती तक्रार न करता घरी परतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर तो सतत तिचे लैंगिक शोषण करू लागला. काही दिवसांपूर्वीच तो अचानक खोली सोडून फरार झाला. पीडितेने वाडी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.