अकोला : इतर पक्षांचे नेते घाऊक पद्धतीने भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यातील अनेकांना आल्याआल्या महत्वाची पदेही मिळत आहेत. पक्षाच्या या धोरणामुळे भाजपचे जुने नेते-कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेचा फटका आगामी निवडणुकांमध्ये बसू नये, यासाठी खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी त्यांची प्रेमळ समजूत घातली. नव्याने येणाऱ्यांमुळे जुन्या निष्ठावानांचे कुठलेही नुकसान होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.

अकोल्यामध्ये शहा यांच्या उपस्थितीत अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम, वर्धा व चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक मंगळवारी झाली.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर आदी उपस्थित होते. शहा यांनी आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना निवडणुकीतील विजयाचा कानमंत्र दिला. पक्षामध्ये प्रवेश करण्याची संख्या वाढणे ही चांगली गोष्ट आहे. सातत्याने काम करणाऱ्या व पक्ष विस्तार करणाऱ्यांची गरज असते. विचारांच्या लढाईसाठी सर्व समाजातील लोकांना पक्षाशी जोडायला हवे. नवीन आलेल्यांमुळे जुन्यांचे नुकसान होणार नाही, अशा शब्दांत शहा यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. कार्यकर्ता भाजपची संपत्ती आहे. कार्यकर्त्यांची भेट घेतल्यामुळे नवी ऊर्जा प्राप्त होते, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>>अखेर मीरा फडणीस आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; सहा जणांची ४७ लाखांनी फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२५ वर्षांच्या विजयाचे लक्ष्य

भारतीय जनता पक्षातील चार पिढय़ांच्या संषर्घामुळे पक्षाला चांगले दिवस आले आहेत. २०२४ची निवडणूक तर आपण जिंकूच. मात्र, भाजपचे पुढील २५ वर्षांतील निवडणुकांमधील विजयाचे लक्ष्य आहे, अशी महत्त्वाकांक्षी घोषणा शहा यांनी आढावा बैठकीत केली.